आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

Posted On: 17 JUL 2021 9:20AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 39 कोटी 96 लाख मात्रा देण्यात आल्या

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 3,02,27,792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

रोगमुक्तीचा दर वाढून आता 97.31% झाला आहे

गेल्या 24 तासांत 43,916 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले

देशात गेल्या 24 तासांत 38,079 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली

देशात सध्या 4,24,025 कोविड सक्रीय रुग्ण आहेत

सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.36% आहे

गेल्या काही काळात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी राहिला असून सध्या हा दर 2.10% आहे

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.91% इतका असून सलग 26 व्या दिवशी हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे

कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 44 कोटी 20 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736377)