PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 16 JUL 2021 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 16 जुलै 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 39.53 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत एकूण 3,01,83,876 जण बरे झाले

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.28%

गेल्या 24 तासांत 40,026 जण बरे झाले

भारतात गेल्या 24 तासांत 38,949 नव्या रुग्णांची नोंद झाली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,30,422 इतकी आहे.

उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णांच्या 1.39%

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.14% इतका आहे

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.99% असून सलग 25 दिवसांपासून हा दर 3% हून कमी

देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 44 .00 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात गुरुवारी 8,010 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 61,89,257  वर गेली आहे. तर 170  रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,26,560 वर पोहोचली. राज्यात कोविड -19 दैनंदिन रुग्णसंख्येत दररोज घट होत आहे. बुधवारच्या तुलनेत मृत्यूची संख्या कायम आहे . बुधवारी 8,602  नवीन रुग्ण आढळले होते  आणि 170 मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत तब्बल 7,391 रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59,52,192 झाली आहे.

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यात गुरुवारी कोरोना विषाणूचे 126 नवे रुग्ण आढळले आणि एकूण बाधितांची संख्या 1,69,341 झाली.  दिवसभरात 134 रूग्णांना घरी सोडण्यात आले तर एकाचा संसर्ग झाल्यामुळे  मृत्यू झाला. बरे झालेल्यांची एकूण संख्या 1,64,460 वर गेली असून मृतांची संख्या 3,102 झाली आहे.

गोव्यात आता 1,779 सक्रिय रुग्ण उरले आहेत. 

M.Chopade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736311) Visitor Counter : 183


Read this release in: English , Hindi , Punjabi