विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
काही काळ दिसल्यानंतर अंतर्धान पावलेल्या ताऱ्यांच्या समूहाचा खगोल शास्त्रज्ञाना लागला शोध
Posted On:
16 JUL 2021 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्रज्ञाना नऊ ताऱ्यांप्रमाणे दिसणारे घटक आढळले असून जुन्या छायाचित्रात छोट्या भागात दिसणारा हा घटक अर्धा तासात दिसेनासा झाल्याचे आढळले आहे.
या संदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोगअंतर्गत विविध देशातल्या खगोल शास्त्रज्ञानी, आकाशातल्या दिसणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या अशा घटकांचा, रात्रीच्या आकाशाचे जुने आणि नवे छायाचित्र यांची तुलना करत मागोवा घेतला आणि या अस्वाभाविक निसर्गघटनेची नोंद घेतली आणि विश्वातल्या बदलांची नोंद घेण्यासाठी याचा मुळापासून अभ्यास हाती घेतला.
काचेच्या प्लेटचा वापर करत 12 एप्रिल 1950 पासून रात्रीच्या आकाशाचे छायाचित्र घेणाऱ्या,अमेरिकेतल्या कॅलीफोर्नियातल्या पालोमर वेधशाळेने दिलेल्या पूर्वीच्या छायाचित्राचा शोध स्वीडन,अमेरिका, युक्रेन,आणि डॉ आलोक गुप्ता यांच्यासह भारतातले शास्त्रज्ञ आणि एआरआयईएसचे शास्त्रज्ञ यांनी घेतला असता हे क्षणिक तारे अर्ध्या तासानंतरच्या छायाचित्रात दिसत नसल्याचे आणि तेव्हापासून गायबच असल्याचे आढळून आले. दिसल्यानंतर अंतर्धान पावणारा असा समूह खगोल शास्त्राच्या इतिहासात प्रथमच समोर आला आहे.
गुरुत्वाकर्षणीय लेन्सिंग, परिवर्तनशील तारे यासारख्या स्थापित अंतराळ भौतिक घटनांमध्ये, आकाशातल्या या वेगाने घडणाऱ्या बदलासाठी कारणीभूत असल्याचे कोणतेही स्पष्टीकरण खगोल शास्त्रज्ञाना आढळले नाही.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या नैनिताल इथल्या आर्यभट्ट रिसर्च इन्सीट्युट ऑफ ऑब्झार्वेशन सायन्स मधले वैज्ञानिक डॉ आलोक सी गुप्ता या अभ्यासात सहभागी झाले होते. नेचरच्या ‘सायंटीक रिपोर्ट’ मध्ये तो नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासात अद्यापही ‘नऊ एकाचवेळी संक्रमणाचे’ मूळ कारण उलगडण्यात आलेले नाही. 1950 पासूनच्या डीजिटाईझ डाटा मध्ये सौर प्रतिबिंबात याबाबत काही उलगडा होण्याबाबत आता उत्सुकता आहे.
प्रकाशन लिंक
https://www.nature.com/articles/s41598-021-92162-7
अधिक तपशीलासाठी डॉ आलोक चंद्र गुप्ता (Scientist-F) (+91-7895966668, alok@aries.res.in ) यांच्याशी संपर्क साधता येईल.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736175)
Visitor Counter : 288