PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 12 JUL 2021 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 12 जुलै 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारताच्या  कोविड -19 महामारी विरोधातील लढाईत कोविडमुक्त होणाऱ्या रूग्णांनी एकूण 3 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा केला पार केला आहे.

महामारीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत 3,00,14,713 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत, गेल्या 24 तासात 39,649 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढता कल दर्शवित असून सध्या तो 97.22 % वर पोहोचला आहे.

दुसऱ्या बाजूला भारताच्या एकूण लसीकरणाने 37.73 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,51,209 सत्रांमधून 37,73,52,501 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 12,35,287 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 भारतात 37,154 दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

सलग 15 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रसरकारच्या सातत्यपूर्ण आणि  सामूहिक प्रयत्नांचाच हा परिणाम आहे.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,50,899 आहे आणि देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्या केवळ 1.46% इतकी आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत असून गेल्या 24 तासात देशभरात 14,32,343 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 43 कोटींपेक्षा (43,23,17,814) जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत.

चाचण्यांच्या दरात एकीकडे वाढ होत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा 2.32 % आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.59 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर सलग 21 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. तर सलग 35 दिवस तो 5 % पेक्षा कमी आहे.

इतर अपडेट्स :

  • कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध आहे. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेची पूर्वसूचना आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.
  • त्रिपुरामध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस स्वरूपाचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या वाढत आहे अशा प्रकारचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले आहे. या संदर्भात, माहिती अशी आहे की, संपूर्ण जनुकीय अनुक्रमासाठी (डब्ल्यूजीएस) 152 नमुने त्रिपुराहून एनआयबीएमजी कल्याणी येथे  पाठविण्यात आले.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायन व खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज भावनगर येथील सर तक्तसिंहजी रूग्णालयात केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत दोन पीएसए संयंत्रांचे व्हर्च्युअली उद्‌घाटन केले. प्रत्येकी 1000 एलपीएम क्षमतेच्या दोन ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांसह कॉपर पाइपिंग नेटवर्क आणि अग्निशमन यंत्रणा आणि स्वयंचलित ऑक्सिजन सोर्स चेंजओव्हर प्रणाली सारख्या संलग्न सुविधांचे उद्‌घाटनही यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात रविवारी 8,535 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून राज्याची एकूण संख्या 61,57,799 इतकी झाली आहे. 6,013 रूग्णांना आज घरी सोडण्यात आल्यामुळे बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 59,12,479 वर गेली आहे. दुसरीकडे, मृतांचा आकडा 156 ने वाढून 125,878 झाला आहे. राज्यात सध्या 1,16,165 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  महाराष्ट्राचा रुग्ण बरे होण्याचा दर  96.02 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 2.04 टक्के आहे. महाराष्ट्राने 11 जुलै रोजी 949 केंद्रांमधून 1,76,959 लोकांचे  लसीकरण केले .  राज्यात आतापर्यंत 3,65,25,990 लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली  आहे.

गोवा अपडेट्‌स:-

गोवा सरकारने रविवारी कोरोना संसर्गामुळे राज्यव्यापी संचारबंदी 19 जुलैपर्यंत वाढवली आहे मात्र काही नियम शिथिल केले असून  जिम 50 टक्के क्षमतेने  पुन्हा सुरु करायला परवानगी देण्यात आली आहे. गोव्यात कोविड -19 बाधितांची संख्या 131 ने वाढून 1,68,716 वर गेली आहे. रविवारी  दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे मृत्यू झालेल्यांची एकूण  संख्या 3,097  झाली आहे . दिवसभरात एकूण 241 रूग्ण संसर्गातून बरे झाले आणि त्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,63,771 वर पोहचली आहे . सध्या राज्यात 1,848 सक्रिय रुग्ण आहेत.

 

G.Chippalkatti/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734928) Visitor Counter : 153