आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
गैरसमज आणि वस्तुस्थिती
त्रिपुरामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद नाही
नमुने चाचणीत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले
Posted On:
11 JUL 2021 8:44PM by PIB Mumbai
त्रिपुरामध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस स्वरूपाचा संसर्ग झालेली रुग्णसंख्या वाढत आहे अशा प्रकारचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले आहे. या संदर्भात, माहिती अशी आहे की,
• संपूर्ण जनुकीय अनुक्रमासाठी (डब्ल्यूजीएस) 152 नमुने त्रिपुराहून एनआयबीएमजी कल्याणी येथे पाठविण्यात आले.
• सरसकट घेतलेले हे नमुने एप्रिल ते मे 2021 दरम्यान आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या लोकांचे होते.
• एनआयबीएमजी कल्याणी येथे झालेल्या डब्ल्यूजीएसचा निकाल -
o 3 नमुन्यांची चाचणी B.1.1.7 साठी सकारात्मक आली
o 11 नमुन्यांची चाचणी B.1.617.1 (कप्पा) साठी सकारात्मक आली.
o 138 नमुन्यांची चाचणी B.1.617.2 (डेल्टा) साठी सकारात्मक आली.
वरील अनुक्रमित नमुन्यांपैकी कोणत्याही नमुन्यात डेल्टा प्लसची नोंद झालेली नाही.
***
S.Thakur/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734666)
Visitor Counter : 244