संरक्षण मंत्रालय

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इस्राईलचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद


संरक्षण सहकार्य वाढविणे आणि इस्राईलबरोबर सामरिक भागीदारी विकसित करण्यावर दिला भर

Posted On: 09 JUL 2021 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

केंद्रीय संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी दिनांक 09  जुलै, 2021 रोजी इस्राईलचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल (रेस) बेंजामिन गान्ट्झ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.   इस्रायलनचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणून कार्यभार स्विकारल्याबद्दल  राजनाथ सिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दूरध्वनी संभाषणानंतरच्या केलेल्या ट्विटर संदेशात संरक्षण मंत्री म्हणाले की, संरक्षण सहकार्य करण्यासाठी आणि सामरिक भागीदारीला आणखी सशक्त करण्यासाठी इस्रायलबरोबर एकत्र कार्य  करण्याची राजनाथ सिंह यांची इच्छा  आहे. यांनी कोविड-19  महामारी हाताळण्यासाठी इस्रायलनेही भारताला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी लेफ्टनंट जनरल (रेस) बेंजामिन  गान्ट्झ यांचे आभार मानले आहेत.

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1734276) Visitor Counter : 227