रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गुणवत्तेशी तडजोड न करता नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Posted On: 09 JUL 2021 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

गुणवत्तेशी तडजोड न करता नाविन्यपूर्ण  संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यआणि सांगितले. भारतातील रस्ते विकास या विषयावरील 16 व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलचा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर दिला.

सुमारे 63 लाख किलोमीटर रस्त्याचे जाळे असणारा भारत हा याबाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असेही गडकरी म्हणाले. रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, कारण 70 टक्के वस्तू आणि सुमारे 90 टक्के प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो. पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत भारताला 5  ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले, सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1.4 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच  111  लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यावर्षी सरकारने पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च 34 टक्क्यांनी वाढवून 5.54 लाख कोटी रुपये केला आहे. पायाभूत सुविधांमधील वाढीव गुंतवणूकीमुळे कोविड महामरीच्या काळात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ते म्हणाले कि दररोज 40 किमी प्रमाणे 60,000 कि.मी. लांबीचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे त्यांचे  उद्दिष्ट आहे.

संपूर्ण कार्यक्रमाची लिंक :-

https://youtu.be/xYxobHaKGQg

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1734212) Visitor Counter : 217