मंत्रिमंडळ

भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) आणि जपान फेअर ट्रेड कमिशन (जेएफटीसी) यांच्यातील सहकार सामंजस्य करारास (एमओसी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 08 JUL 2021 8:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पर्धा कायदा आणि धोरणाच्या बाबतीत सहकार्य वृद्धिंगत आणि मजबुत करण्यासाठी भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) आणि जपान फेअर ट्रेड कमिशन (जेएफटीसी) यांच्यातील सहकार सामंजस्य करारास (एमओसी) मान्यता दिली.

 

प्रभावः

माहितीच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून मान्यताप्राप्त सहकार सामंजस्य करार सीसीआयला जपानमधील त्याच्या समकक्ष संस्थेचे अनुभव आणि धडे गिरवण्यास सक्षम करेल ज्याद्वारे कार्यक्षमतेत वाढ होईल. हे सीसीआयद्वारे स्पर्धा कायदा 2002 ची अंमलबजावणी सुधारण्यात मदत करेल. त्याच्या फलनिष्पत्तीचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल तसेच समानता आणि सर्वसमावेशकता वाढेल.

 

तपशीलः

तांत्रिक सहकार्य, अनुभव सामायिकरण आणि अंमलबजावणी सहकार्याच्या क्षेत्रात विविध क्षमता बांधणी उपक्रमांच्या माध्यमातून तसेच माहितीच्या देवाणघेवाणीतून स्पर्धा कायदा व धोरणाच्या बाबतीत सहकार्यास प्रोत्साहन व बळकटी देण्याचा विचार केला जाईल.

 

पार्श्वभूमी:

स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 18 ने सीसीआयला कायद्याअंतर्गत आपले कर्तव्य बजावण्याच्या किंवा कर्तव्याच्या हेतूने परदेशातील कोणत्याही संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यास परवानगी दिली आहे.

***

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733920) Visitor Counter : 175