भूविज्ञान मंत्रालय

डॉ. जितेन्द्र सिंह यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा स्विकारला कार्यभार

Posted On: 08 JUL 2021 7:46PM by PIB Mumbai

 

डॉ. जितेन्द्र सिंह यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा (स्वतंत्र प्रभार) कार्यभार स्विकारला आहे.  डॉ सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे महत्व अधोरेखित केले. मंत्रालयाच्या  विविध पैलूंविषयी विशेषत: जनतेला हवामानाच्या अंदाजाबाबत अवगत करणे याबाबत त्यांनी सांगितले. शास्त्रीय विश्लेषण, अंदाज, आकडेवारी या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची मदत पृथ्वी विज्ञान मंत्रालय करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताने अभिनव हवामान अंदाज तंत्रज्ञान विकसित केले असून जगभरातून त्याचे कौतुक होत आहे. अनेक देश त्याचे अनुकरण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नंतर त्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जनतेला आणि विशेषत: शेतकऱ्यांना लाभदायक ठरतील अशा वैज्ञानिक कार्याला वेग देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले.

केन्द्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह नवी दिल्ली इथे गुरुवारी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा (स्वतंत्र प्रभार) कार्यभार स्वीकारताना.

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733854) Visitor Counter : 113