रेल्वे मंत्रालय

रेल्वे, दळणवळण आणि तंत्रज्ञान क्षेत्रे सर्व भारतीयांच्या जीवनाला स्पर्श करणारी; या क्षेत्रांद्वारे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध -  श्री  अश्विनी वैष्णव

Posted On: 08 JUL 2021 6:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रोनिक्स तसेच माहिती-तंत्रज्ञान मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांनी आज कार्यभार स्वीकारला. रेल भवन, इलेक्ट्रोनिक निकेतन आणि संचार भवन या कार्यालयात, कार्यभार स्वीकारण्याचा कार्यक्रम झाला.

अश्विनी वैष्णव ओडिशातील राज्यसभा सदस्य आहेत. आयआयटी कानपूर इथून तंत्रज्ञानाची तसेच व्हॉर्टन इथून त्यांनी एमबीएची पदवी

घेतली आहे. तंत्रज्ञान, अर्थक्षेत्राची कौशल्याशी सांगड घालत दुर्बल घटकांसाठी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा त्यांना अनुभव आहे.

         

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733808) Visitor Counter : 195