महिला आणि बालविकास मंत्रालय

डॉ. मुंजपरा महेन्द्रभाई यांनी महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्विकारला कार्यभार

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2021 6:45PM by PIB Mumbai

 

डॉ. मुंजपरा  महेन्द्रभाई यांनी आज महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला. महिला आणि बालविकास मंत्रालयाबरोबरच त्यांना आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. महेन्द्रभाई हे संसदेचे सदस्य असून 17 व्या लोकसभेत ते गुजरातमधील सुरेन्द्रनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.

गुजरात विद्यापीठातून जनरल मेडिसीन आणि थेरापेक्टिक्स या विषयात मंत्री महोदयांनी एमडी पदवीही घेतली आहे.

राजकीय कारकिर्दीआधी त्यांनी गुजरातमधे कार्डिओलॉजिस्ट आणि प्रोफेसर इन मेडीसीन मधे सेवाही दिली आहे.

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1733806) आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada