कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारला कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा कार्यभार, राजीव चंद्रशेखर यांनीही राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 6:30PM by PIB Mumbai
धर्मेंद्र प्रधान यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासह, कर्नाटक येथून राज्यसभेचे खासदार असलेले राजीव चंद्रशेखर यांनी राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचे आधीचे मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी दोन्ही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या खात्यामार्फत कौशल्य विकासाच्या कार्याला अधिक सक्षम करण्यास तसेच, भविष्यातील जबाबदाऱ्यांसाठी सज्ज होण्यासाठी युवकांची कौशल्ये वाढवण्यास आपण कटिबद्ध असल्याचे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. कौशल्य आणि रोजगाराची सांगड घालण्याला प्राधान्य देऊ असेही त्यांनी सांगितले. राजीव चंद्रशेखर यांनी राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल प्रधान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. एकत्रित काम करून, उद्यमशीलतेला गती देण्याचा आणि पंतप्रधानांच्या
दृष्टीकोनानुसार, भारताला जागतिक कौशल्याची राजधानी बनवण्याचा संकल्प पूर्ण करु असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.
कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी, आपला सन्मान असल्याची प्रतिक्रिया राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी दिली. पंतप्रधानांचे डिजिटल, कुशल नव भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपण अविरत कष्ट करु असे चंद्रशेखर म्हणाले.
***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733798)
Visitor Counter : 179