ग्रामीण विकास मंत्रालय

श्री गिरिराज सिंह यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रीपदाचा स्विकारला कार्यभार


श्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री पदाचा स्विकारला पदभार

Posted On: 08 JUL 2021 6:10PM by PIB Mumbai

 

श्री गिरिराज सिंह यांनी केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रीपदाचा कार्यभार ग्रहण स्विकारला आहे.

कार्यभार स्विकारण्याची माहिती श्री सिंह यांनी ट्विट करत दिली. तसेच नवीन जबाबदारी सोपवणे आणि विश्वास व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांचे मनापासून आभार मानले आहेत.

श्री नरेंद्र सिंह तोमर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गिरिराज सिंह यांचे त्यांच्या कक्षात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती देखील यावेळी  उपस्थित होत्या.

संपूर्ण निष्ठेने जबाबदाऱ्या पूर्ण करत राहतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

श्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी ग्रामविकास राज्यमंत्री पदाचा  कार्यभार स्विकारला.

ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव श्री नागेंद्र नाथ सिन्हा, अपर सचिव श्रीमती अलका उपाध्याय आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733788) Visitor Counter : 223