अर्थ मंत्रालय
डॉ. भागवत कृष्णराव कराड यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 4:14PM by PIB Mumbai
डॉ. भागवत कृष्णराव कराड यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.

डॉ.भागवत कृष्णराव कराड आज नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना
डॉ.कराड हे पहिल्यांदाच राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. ते समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रीय असून, त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौरपद तसेच मराठवाडा कायदे विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ.कराड यांचे वय 64 असून, ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.
एमबीबीएस पदवीसोबतच, डॉ.कराड यांनी सामान्य शस्त्रक्रिया विषयात एमएस ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे, तसेच त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातून बालरोग शस्त्रक्रिया या विषयात एमसीएच आणि सामान्य शस्त्रक्रिया या विषयात एफसीपीएस या पदव्यादेखील मिळविल्या आहेत.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733709)
Visitor Counter : 250