पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
हरदीप सिंग पुरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला
रामेश्वर तेली यांच्याकडे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी
Posted On:
08 JUL 2021 3:39PM by PIB Mumbai
श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. तर श्री. रामेश्वर तेली यांच्याकडे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना होण्याआधी या मंत्रालयाची जबाबदारी ज्यांच्याकडे होते ते धर्मेंद्र प्रधान देखील यावेळी उपस्थित होते.
पुरी यांनी यावेळी खालील निवेदन दिले:
“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अत्यंत महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्यामुळे आज मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. धर्मेंद्रजी प्रधान यांनी या मंत्रालयाचे मंत्री म्हणून फार मोठे कार्य केले आहे. त्याला साजेसे काम होणे महत्त्वाचे आहे.
या मंत्रालयाचे कार्य देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित आहे. या मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ऊर्जाविषयक मुद्द्यांमध्ये मोठी क्षमता आणि अनेक आव्हाने दडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीला अनुसरून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे.”
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733681)
Visitor Counter : 173