आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशाच्या कोविड लसीकरण मोहिमेने ओलांडला 36.48 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा
गेल्या 24 तासांत 45,892 नवे कोविड रुग्ण
देशातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या सध्या 4,60,704 एकूण रुग्णसंख्येच्या 1.50% इतकी
रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचा दैनंदिन दर(2.42%) महिनाभरापासून अधिक काळ 5% हून कमी
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2021 10:24AM by PIB Mumbai
देशातील एकूण लसीकरण मोहिमेअंतर्गत 36.48 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडण्यात आला असल्याचे आज सकाळी सात वाजताच्या प्राथमिक आकडेवारीत निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 47,40,833 सत्रांतून 36,48,47,549 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 33,81,671 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
खालील तक्यात सविस्तर माहिती देण्यात आली आहे: :
कोविड-19 लसी सार्वत्रिक मोफत उपलब्ध करून देण्याची मोहिम देशभर 21 जूनपासून सुरु झाली आहे. लसीकरणाची व्याप्ती आणि वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 45,892 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने दैनंदिन रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वय राखून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील उप्चाराधीन रूग्णांची संख्या आज 4,60,704 वर पोहोचली असून, देशातील एकूण कोविड रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.50% इतके आहे.

ही महामारी सुरु झाल्यापासून कोविड चा संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी 2,98,43,825 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात, 44,291 रुग्ण बरे झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.18%, पर्यंत पोहोचला असून हा दर सातत्याने वाढतो आहे.

देशात चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढवण्यात आली असून, गेल्या 24 तासांत 18,93,800 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 42.52 कोटींपेक्षा अधिक (42,52,25,897) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एकीकडे, चाचण्यांची संख्या वाढत असतांनाच, साप्ताहिक रुग्ण पॉझिटिव्हीटी दर, कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर, 2.37% तर, दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.42% इतका आहे. गेल्या 17 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सातत्याने 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे तर महिन्याभरापासून तो 5% पेक्षा कमी आहे.

****
Jaydevi PS/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1733590)
आगंतुक पटल : 300