संरक्षण मंत्रालय

आयएनएस तबर या भारतीय युद्धनौकेचा इटलीमधील नेपल्सजवळ इटालियन नौदलासह संयुक्‍त सराव

Posted On: 07 JUL 2021 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2021


भूमध्य सागरात सध्या तैनात असलेल्या आयएनएस तबरने 03 जुलै 2021 रोजी इटलीच्या नेपल्स बंदरात प्रवेश केला. इटालियन नेव्हीकडून या जहाजाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बंदरातील मुक्कामादरम्यान, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेश मांगीपुडी यांनी प्रीफेक्ट ऑफ नेपल्स अथॉरिटी, जनल इटालियन नेव्हल हेडक्वार्टर आणि कोस्टगार्ड हेडक्वार्टर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

बंदरातून निघताना या जहाजाने आयटीएस अँटोनियो मार्सेग्लिया (एफ 597) यांच्यासह टायरेनेयनियन समुद्रात 04 आणि 05 जुलै 2021 रोजी समुद्री भागीदारीत सरावही केला. या सरावांमध्ये हवाई संरक्षण प्रक्रिया, समुद्रावरील संप्रेषण कवायती, आणि दिवसा आणि रात्री होणाऱ्या क्रॉस डेक हेलो ऑपरेशन्सचा समावेश होता. नौदल सरावाची परस्पर कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सागरी धोक्यांविरुद्ध एकत्रित काम करण्यासाठी हा अशा प्रकारचा सराव दोघांनाही फायदेशीर होईल.

नौदलाच्या प्रथेनुसार या जहाजांच्या सरावाचा शेवट दोन्ही जहाजांच्या 'स्टीम पास'ने केला.   

 

* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733355) Visitor Counter : 343