राष्ट्रपती कार्यालय

चार देशांच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्रपतींना परिचय - पत्र सादर केली

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2021 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

 

 राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (6 जुलै 2021) एका आभासी समारंभात कोलंबिया प्रजासत्ताक, उरुग्वे, जमैका आणि आर्मेनिया प्रजासत्ताकचे राजदूत / उच्चायुक्त यांची परिचय - पत्र स्वीकारली. पुढील राजदूत/उच्चायुक्तांनी  परिचय - पत्र सादर  केली -

1. महामहिम  मारियाना पचेको मोंटेस, कोलंबियाच्या राजदूत

2. महामहिम अल्बर्टो एंटोनियो गुआनी अमरिला, उरुग्वेचे राजदूत

3. महामहिम  जेसन कीट्स मैथ्यू हॉल, जमैकाचे  उच्चायुक्त

4. महामहिम यूरी बाबाखानयन, आर्मेनियाचे राजदूत

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीबद्दल राजदूतांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारताचे  सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध  आहेत आणि आमचे संबंध शांतता व समृद्धीच्या समान दृष्टिकोनातून खोलवर रुजले आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले की  सामूहिक आरोग्य व आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कोविड -19 रोगाला निर्णायक व समन्वित प्रतिसाद देण्याच्या जागतिक प्रयत्नात भारत आघाडीवर आहे. ते पुढे म्हणाले की, ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून भारताने कोविडविरूद्धच्या जागतिक लढाईत अनेक देशांना आवश्यक औषधे आणि उपकरणे पुरवून  मदत केली आहे.

राजदूतांनी /उच्चायुक्तांनी आपापल्या नेत्यांच्या  वतीने शुभेच्छा दिल्या आणि भारताशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी काम करण्याच्या  बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1733210) आगंतुक पटल : 302
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu