PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
05 JUL 2021 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 5 जुलै 2021
- 35.28 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- India reports 39,796 new cases in last 24 hours
- India's Active Caseload declines to 4,82,071
- Active cases constitute 1.58% of total cases
- 2,97,00,430 Total Recoveries across the country so far
- 42,352 patients recovered during last 24 hours
- Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 53rd consecutive day
- Recovery Rate increases to 97.11%
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.40%
- Daily positivity rate at 2.61%, less than 5% for 28 consecutive days
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारतात गेल्या 24 तासांत 40,000 पेक्षा(39,756) कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
सलग आठ दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,82,071 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत 3,279 ची घट नोंदली गेली आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ 1.58 % इतके आहेत.
भारताच्या एकूण लसीकरणाने काल 35.28 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा गाठला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 46,34,986 सत्रांद्वारे 35,28,92,046 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसींच्या 14,81,583 मात्रा देण्यात आल्या.
इतर अपडेटस्
- देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा मोफत पुरवठा करून पाठबळ देत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार लसींच्या उत्पादकांकडून उत्पादित लसींपैकी 75% लसींची खरेदी करेल आणि त्यांचा पुरवठा(मोफत) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करेल.सर्व स्रोतांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 36.97 कोटींहून अधिक (36,97,70,980) मात्रा पुरवण्यात आल्या आहेत. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.01 कोटींपेक्षा जास्त (2,01,96,572) शिल्लक आणि वापर न झालेल्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यासाठी उपलब्ध आहेत.
- पंतप्रधानांनी सुरूवातीला सर्व देशांमधील या महामारीला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या शंभर वर्षात अश्या तऱ्हेची महामारी जगाने पाहिलेली नाही आणि अश्या तऱ्हेच्या आव्हानाचा सामना शक्तीशाली देशांनाही एकट्याने करता येणे अशक्य होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. माणुसकी आणि माणसाच्या भल्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मार्गक्रमणा करायला हवी हा या महामारीने शिकवलेला मोठाच धडा आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपल्याला एकमेकांकडून शिकणे तसेच आपल्याला सापडलेली योग्य दिशा दुसऱ्याला दाखवणे भाग आहे असेही त्यांनी सांगितले.
- कोविन जागतिक परिषद 2021 मध्ये पंतप्रधानांचे संबोधन
- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, तसेच कोविड लसींचे उत्पादन भविष्यात वाढणार असे गृहीत धरुन, केंद्र सरकारने, लसींच्या चाचण्यांना गती देण्यासाठी/ लसी बाजारात आणण्यापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने, अतिरिक्त प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, देशात अशी एकच केंद्रीय औषध प्रयोगशाळा कसौली येथे आहे. भारतात मानवी शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधक औषधे/इंजेक्शन्सना (लस आणि अँटीसेरा) प्रमाणपत्र देणारी ही राष्ट्रीय नियंत्रक प्रयोगशाळा आहे.
- मे-जून 2021 दरम्यान कोविड 19 च्या दुसर्या लाटेच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ (पीएमजीकेवाय) महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी आणि गोव्यातील 5.32 लाख लोकांना मिळाला आहे. पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आघाडीवर असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- लोकांना मोफत धान्य पुरवण्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम या महामारीच्या कालखंडात केंद्र सरकार राबवत आहे, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांपुढे बोलताना नमूद केले. यावर्षी धान्य खरेदीतही मोठे टप्पे गाठले गेले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय अन्न महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसार माध्यमांना या वर्षीच्या विपणन हंगामात झालेल्या गहू आणि खरेदी बद्दलचे प्रेझेन्टेशन दिले.
- केंद्रीय रसायने आणि खत, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी आज अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. ट्वीटर संदेशात मांडवीय म्हणाले, झायडस कॅजिला ही 'झायकोव्ह-डी' (ZyCov-D) विकसित करणारी कंपनी असून ही जगातील डीएनए-आधारीत पहिली कोविड-19 लस असणार आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :-
महाराष्ट्रात रविवारी 9,336 नव्या कोरोना विषाणू रुग्णांची आणि 123 मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोविड रुग्णसंख्या संख्या 60,98,177 तर एकूण मृत्यूंची संख्या 1,23,030 वर पोहोचली. दिवसभरात 3,378 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले त्यामुळे आतापर्यंत कोविडमधून मुक्त झालेल्यांची महाराष्ट्रातील संख्या 58,48,693 झाली आहे तर 1,23,225 सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आजारातून बरे होण्याचा दर 95.91 टक्के तर मृत्यूदर 2.01वर पोचला आहे. मुंबईत दिवसभरातील रुग्णसंख्या 553 तर 24 मृत्यू झाले. एकूण रुग्णसंख्या 7,24,675 आणि मृत्यूंची एकूण संख्या 15,544 वर पोचली आहे. राज्यात लसीकरणाच्या एकूण 3.39 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.
गोवा अपडेट्स:-
वाढत्या कोविड केसेस कमी करण्यासाठी गोव्यातील सध्याची राज्यस्तरावरील संचारबंदी 12 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतू, सामाजिक, राजकिय. सांस्कृतिक समारंभ, विवाहसोहळे, आणि इतर सभांना एकूण जागेच्या 50 टक्क्यांपर्यंत वा 100 जणांपर्यंतच उपस्थिती असण्यास परवानगी आहे. राज्यातील कॅसिनोज मात्र 12 जुलैपर्यंत बंद राहतील. गोव्यातील कोरोनाविषाणू रुग्णसंख्या रविवारी 164 ने वाढून 1,67,436 वर पोचली. तर 4 रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृत्यूंची संख्या 3,073 वर पोचली. दिवसभरात 202 कोविड रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. राज्यातील बरे होणाऱ्यांची संख्या 1,62,276 वर पोचली. आता राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 2,087 एवढी आहे.
Important Tweets
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732973)
Visitor Counter : 223