ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

लोकांना मोफत धान्य पुरवण्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम  या महामारीच्या कालखंडात केंद्र सरकार राबवत आहे: धान्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव

Posted On: 05 JUL 2021 8:11PM by PIB Mumbai

 

धान्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्य योजनेची अंमलबजावणी तसेच या विपणन हंगामात धान्याची खरेदी करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि त्या प्रयत्नांना आलेले यश याचे कथन विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी प्रसार माध्यमांना आज केले.

लोकांना मोफत धान्य पुरवण्याचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम या महामारीच्या कालखंडात केंद्र सरकार राबवत आहे, असे पांडे यांनी प्रसारमाध्यमांपुढे बोलताना नमूद केले.   यावर्षी धान्य खरेदीतही मोठे टप्पे  गाठले गेले, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय अन्न महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसार माध्यमांना या वर्षीच्या विपणन हंगामात झालेल्या गहू आणि खरेदी बद्दलचे प्रेझेन्टेशन  दिले.

वर्ष 2021-22 च्या रब्बी हंगामात गव्हाची 433.24 लाख मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाल्याचे पांडे यांनी प्रेझेंटेशनच्या दरम्यान माध्यमकर्मींना सांगितले. गतवर्षीच्या म्हणजे 2020 21 च्या रब्बी हंगामात झालेल्या  389.93 लाख मेट्रिक टन  गव्हाची  खरेदी झाली होती. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनी गहू खरेदीत विक्रमी आघाडी घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्यावर्षी 43.39 शेतकऱ्यांना हमी भाव खरेदी यौजनेचा लाभ झाला होता त्या तुलनेत यावर्षी लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 49.16 लाख एवढी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

एक राष्ट्र, एक हमीभाव, एक थेट लाभ हस्तांतरण ही योजना देशभरात राबवली जात  आहे.  आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 84,369.19 कोटी रुपये एवढी   रक्कम देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732919) Visitor Counter : 244