रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची अहमदाबाद येथील लस निर्मिती प्रकल्पाला भेट
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2021 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2021
केंद्रीय रसायने आणि खत, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी आज अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली.
ट्वीटर संदेशात मांडवीय म्हणाले, झायडस कॅजिला ही 'झायकोव्ह-डी' (ZyCov-D) विकसित करणारी कंपनी असून ही जगातील डीएनए-आधारीत पहिली कोविड-19 लस असणार आहे.
मंत्र्यांनी आज हेस्टर बायोसायन्सेसलाही भेट दिली. हेस्टरने कोवॅक्सीन निर्मितीसंदर्भात भारत बायोटेक कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1732671)
आगंतुक पटल : 234