आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती


राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 36.97 कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.01 कोटींपेक्षा जास्त शिल्लक आणि वापर न झालेल्या मात्रा उपलब्ध

Posted On: 05 JUL 2021 10:13AM by PIB Mumbai

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. 21 जून 2021 पासून कोविड-19 लसींच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्याची सुरुवात झाली. अधिकाधिक लसींच्या मात्रा उपलब्ध करून, राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता यावे यासाठी लसींच्या पुरवठ्याची आगाऊ माहिती देऊन आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत करून,  लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे.

 

 देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र  सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींचा मोफत पुरवठा करून पाठबळ देत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार लसींच्या उत्पादकांकडून उत्पादित लसींपैकी 75% लसींची खरेदी करेल आणि त्यांचा पुरवठा(मोफत) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करेल.

सर्व स्रोतांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 36.97 कोटींहून अधिक  (36,97,70,980) मात्रा पुरवण्यात आल्या आहेत.

यापैकी वाया गेलेल्या मात्रांसहित एकूण 34,95,74,408 मात्रांचा (आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार) वापर झाला आहे.

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.01 कोटींपेक्षा जास्त (2,01,96,572) शिल्लक आणि वापर न झालेल्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यासाठी उपलब्ध आहेत.

***

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732772) Visitor Counter : 334