शिक्षण मंत्रालय

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे उद्याच्या  ब्रिक्स सदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणार


भारत यजमान असलेल्या तेराव्या ब्रिक्स शिखरपरिषदेचा भाग म्हणून होत आहे बैठक

IGB – BRICS नेटवर्क विद्यापिठे आणि वरिष्ठ शैक्षणिक अधिकारी यांची गेल्या आठवड्यात झाली बैठक

Posted On: 05 JUL 2021 6:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण, दूरसंचार  तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उद्या ब्रिक्स सदस्य देशांच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार असलेल्या शिक्षणमंत्र्यांच्या आठव्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने सहभागी होतील. यावर्षी भारत यजमान असलेल्या तेराव्या ब्रिक्स शिखरपरिषदेचा एक भाग म्हणून पाच सदस्य देशांचे शिक्षणमंत्री तसेच  शिक्षणक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह ही बैठक होत आहे.

याआधी, ब्रिक्स नेटवर्क विद्यापिठांचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ (IGB – BRICS) 29 जून रोजी या संदर्भात सदस्य राष्ट्रांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी भेटले होते व त्यावेळी पुढील मार्गक्रमणा करण्याबाबत चर्चा झाली होती.  उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे डी पी सिंग, भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचे अध्यक्ष शुभाशिष चौधरी हे ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या  आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळाच्या (IGB – BRICS) बैठकीत भारतातर्फे सभासद म्हणून उपस्थित राहिले होते.  ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या  आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतब्रिक्स सदस्य देशांनी शैक्षणिक व संशोधनातील सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने व्यवस्थेचा विकास आणि व्हर्च्युअल मोड यांच्या आवश्यकतेवर भर दिला गेला.

उदया होणार असलेल्या ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या नियोजित बैठकीआधी ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ शैक्षणिक अधिकारी 2 जुलै रोजीही भेटले होते.

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1732876) Visitor Counter : 280