PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
02 JUL 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 2 जुलै 2021
- 34 Cr. Vaccine Doses (34,00,76,232) administered so far under Nationwide Vaccination Drive
- India reports 46,617 new cases in last 24 hours
- India's Active Caseload declines to 5,09,637
- Active cases constitute 1.67% of total cases
- 2,95,48,302 Total Recoveries across the country so far
- 59,384 patients recovered during last 24 hours
- Daily recoveries continue to outnumber Daily New Cases for 50th consecutive day
- Recovery Rate increases to 97.01%
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.57%
- Daily positivity rate at 2.48%, less than 5% for 25 consecutive days
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटी (34,00,76,232)लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 46,617 नवे रुग्ण आढळले आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 5,09,637 इतकी कमी झाली आहे.
सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.67% इतके आहे.
आतापर्यंत देशात एकूण 2,95,48,302 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 59,384 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग 50 व्या दिवशी अधिक आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.01% पर्यंत वाढले आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% खाली कायम असून, सध्या तो 2.57% इतका आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर 2.48% वर आला असून गेले सलग 25 दिवस हा दर 5% पेक्षा खाली आहे.
चाचण्यांची क्षमता लक्षणीय रीत्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 41.42 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
इतर अपडेटस्
- आणखी एका महत्वाच्या घडामोडीत, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने आज 34 कोटीचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 34,00,76,232 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 42 लाख (42,64,123) मात्रा देण्यात आल्या.
- कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध आहे. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे. लसीच्या 44,90,000 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर असून येत्या 3 दिवसात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.
- कोविड व्यवस्थापनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकार वेळोवेळी,विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना भेट देण्यासाठी केंद्रीय पथके पाठवत असते. केंद्र सरकारने आज केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यात कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पथके नियुक्त केली आहेत. कोविड व्यवस्थापनातल्या प्रयत्नात आणि महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ही पथके या राज्यांना सहाय्य करणार आहेत.
- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज योग्य लस आणि औषधांच्या विकासाला गती देण्यासाठी नवीन कोविड -19 व्हेरिएन्टचे जीनोम सीक्वेन्सिंग जलद गतीने करण्याचे आवाहन केले. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद येथे आगमन झाल्यानंतर सीसीएमबीच्या लाकोन्स (लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिशिज ) सुविधेला भेट दिली.
- देशातील 54,000 वैयक्तिक जीएसटी करदात्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेतल्याबद्दल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीबीआयसीचे कौतुक केले आहे. कोविड महामारीच्या काळात, करदात्यांना विविध सुविधा देण्यात आल्या, ज्यात दोन मोठ्या आर्थिक पैकेजसह, विलंब शुल्कात सवलत, व्याजदारात कपात, मुदतवाढ आणि परताव्यांची मोहीम राबवून करदात्यांच्या हातात पैसा राहील अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच कोविड संबंधी औषधे, उपचार आणि लसी यावरील जीएसटी दरातही सरकारने कपात केली आहे.
- केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) आणि रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लस उत्पादन प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि लसीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लस उत्पादन केंद्राला भेट दिली. केंद्रीय औषधनिर्माण विभागाच्या सचिव एस अपर्णा देखील यावेळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र अपडेट्स :-
महाराष्ट्रात गुरुवारी 9,195 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली त्यामुले कोरोना बाधितांची एकूण संख्या ,60,70,599 इतकी झाली आहे. 252 मृत्यूंची भर पडल्यामुळे महामारीमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढून 1,22,197 पर्यंत पोहोचली आहे. 8,634 रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले यामुळे आतापर्यंत 58,28,535 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सक्रिय रुग्णसंख्या 1,16,667 आहे. आतापर्यंत, कोरोना प्रतिबंधक लसीच्या 32,715,362 मात्रा देऊन लसीकरणात अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.
गोवा अपडेट्स:-
गोव्यात गुरुवारी 231 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,66,920 वर पोहोचली. तर आणखी 221 रूग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. दिवसभरात आणखी सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 3,060 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात बरे झालेल्या 221 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून 1,61,582 झाली आहे. गोव्यात सध्या 2,278 सक्रिय रुग्ण आहेत.
Important Tweets
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732385)
Visitor Counter : 243