उपराष्ट्रपती कार्यालय

लस आणि औषध विकसित करण्याला गती देण्यासाठी नवीन कोविड -19 व्हेरिएन्टचे जीनोम सीक्वेन्सिंग जलद गतीने करण्याचे उपराष्ट्रपतींनी केले आवाहन


विविध व्हेरिएन्टसाठी सार्वत्रिक लस विकसित करण्याबाबत अभ्यास करण्याचे उपराष्ट्रपतींचे आंतरराष्ट्रीय भागीदारीला आवाहन

लसीकरण मोहीम ही राष्ट्रीय चळवळ झाली पाहिजे: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी सीसीएमबीच्या लॅकोन्सला (लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिशिज) भेट दिली

कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी करण्यात सिसिएमबीने बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा

वन्यजीव संवर्धनासाठी विविध जैव तंत्रज्ञान साधने विकसित केल्याबद्दल लाकोन्सची केली प्रशंसा

उपराष्ट्रपतींनी हवामान बदलाच्या प्रभावांचा संदर्भ देत आपल्या परिसंस्थेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या महत्वावर दिला भर

Posted On: 02 JUL 2021 4:21PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज योग्य लस आणि औषधांच्या विकासाला गती देण्यासाठी नवीन कोविड -19 व्हेरिएन्टचे जीनोम सीक्वेन्सिंग जलद गतीने करण्याचे आवाहन केले.

उपराष्ट्रपतींनी हैदराबाद येथे आगमन झाल्यानंतर  सीसीएमबीच्या लाकोन्स (लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिशिज ) सुविधेला भेट  दिली. त्यांनी लाकोन्सचे  प्रभारी वैज्ञानिक डॉ. कार्तिकेयन वासुदेवन यांचे सादरीकरण पाहिले आणि त्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय वन्यजीव जनुकीय संसाधन बँक, सहाय्यक पुनरुत्पादन प्रयोगशाळा  आणि प्राण्यांच्या पिंजऱ्याची देखील पाहणी केली.

वैज्ञानिक आणि संशोधकांना संबोधित करताना नायडू म्हणाले की सिक्वेन्सिंग हे एक सहायक साधन म्हणून, नवीन विषाणू उत्परिवर्तनांची लक्षणे ओळखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि त्यामुळे कोविड -19 च्या प्रसाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच वेळेवर उपाययोजना करण्यात देखील यामुळे मदत होईल, असे ते म्हणाले.

देशातील काही प्राणिसंग्रहालयात बिबटयांना कोविड -19 ची लागण झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर नवीन व्हेरिएंटचे जीनोम सिक्वेन्सिंग करणे आवश्यक असल्याचे सांगून नायडू यांनी मानवाकडून प्राणी किंवा त्याउलट, विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नवीन व्हेरिएन्ट उदभवू शकतो आणि सध्याच्या महामारी विरोधी लढ्यात नवीन आव्हाने निर्माण करू शकतो.

विविध सार्स -सीओव्ही -2 व्हेरिएन्ट निष्प्रभ करणारी सार्वत्रिक लस विकसित करण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांला बळकटी देण्यावर देखील उपराष्ट्रपतींनी भर दिला.

लोकांनी लस घेण्याबाबत संकोच टाळावा असे आवाहन करत नायडू म्हणाले की, भारतात बनलेल्या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत आणि प्रत्येकाने लस घेऊन   इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांनी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना या मोहिमेत सक्रिय भागीदार होण्याचे आणि लसीकरणासाठी लोकांना प्रेरित करण्याचे आवाहन केले. लसीकरण मोहीम ही एक राष्ट्रीय चळवळ बनली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

कोविड 19 वर मात करण्यासाठी सीसीएमबीच्या योगदानाबद्दल प्रशंसा करत नायडू यांनी संस्थांदरम्यान मजबूत सहयोगात्मक व्यवस्थेची गरज असल्याचे सांगितले. संसर्गजन्य रोगांचा उद्भव समजून घेण्यासाठी आणि भविष्यात अशाप्रकारच्या महामारीचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दुवा साधण्यासाठी लॅकोन्स -सीसीएमबी योग्य प्रकारे काम करत आहेत, असे ते म्हणाले.

प्राणिसंग्रहालयातील बंदिस्त असलेल्या प्राण्यांची कोविड -19 तपासणी करण्याच्या दृष्टीने, प्राणी संग्रहालयातील आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी लॅकोन्स ने अलीकडेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा सहज संसर्ग अनेक आव्हाने उभी करत आहे याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, ज्या प्रकारे हा विषाणू नवीन व्यक्ती किंवा इतर प्राण्यांच्या प्रजातींना संक्रमित करू शकेल ते क्षेत्र संशोधनाचे महत्त्वपूर्ण क्षेत्र असेल. या क्षेत्रात सीसीएमबी पुढाकार घेऊन काही मोलाचे योगदान देऊ शकेल, असे ते म्हणाले

सहाय्य्यकारी पुनरुत्पादन आणि न्यायवैद्यक यासह वन्यजीव संवर्धनासाठी अनेक जैवतंत्रज्ञान साधने विकसित केल्याबद्दल लॅकोन्सची प्रशंसा करत उपराष्ट्रपतींनी काळवीट, सांबर, कबूतर आणि लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पिसूरी हरीण या प्रजातींच्या यशस्वी पुनरुत्पादनाचा उल्लेख केला आणि

काश्मीरमधील हंगुल हरण, छत्तीसगडमधील वन्य म्हशी आणि दार्जिलिंगमधील लाल पांडा यांच्या पुनरुत्पादनासाठी असेच प्रयत्न वाढवावेत अशी सूचना केली.

जगातील अशा 23 प्रयोगशाळांमधील विशेष प्रयोगशाळांच्या साखळीपैकी लॅकोन्समधील राष्ट्रीय वन्यजीव जनुकीय स्रोत बँक ही एक आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

लॅकोन्सच्या उपक्रमांचा आणि लुप्तप्राय प्रजातींच्या जैव-बँकिंगला चालना देण्यासाठी पाच प्राणीसंग्रहालय असलेल्या संघटनेच्या स्थापनेचा संदर्भ देताना त्यांनी

त्याला वेळेवर घेतलेला पुढाकार असे संबोधले.  हवामान बदलाचा सर्व जीवनांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधून नायडू यांनी अधोरेखित केले की, भारतामध्ये काही सर्वाधिक जैव-वैविध्यता असलेले प्रदेश आहेत आणि परिसंस्थेच्या विस्तृत श्रेणीचे भारत गृह आहे.

हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी, उपराष्ट्रपती म्हणाले की, मोठ्या प्रमाणात वनीकरण कार्यक्रम राबविणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात आणि परिसरात वृक्ष लागवडीसाठी  सक्रिय सहभाग घ्यावा.

ते म्हणाले की, आपल्याला केवळ आपल्या परिसंस्थेचेच रक्षण आणि संवर्धन करायचे नाही तर प्राणी, वनस्पती आणि मानवाच्या हितासाठी, लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आधुनिक जैव-तंत्रज्ञानाची साधने वन्यजीव आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी वन्यजीव संवर्धनासाठी जनुकीय स्रोत बँकया पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यांनी संशोधन अभ्यासकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याविषयी माहिती घेतली.

तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली, सीसीएमबी चे संचालक डॉ. विनय नंदीकुरी, सीसीएमबी-लॅकोन्सचे वैज्ञानिक-प्रभारी डॉ. कार्तिकेयन वासुदेवनतेलंगणाच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन आर. शोभा, वैज्ञानिक आणि संशोधन तज्ञ उपस्थित होते.

***

S.Tupe/S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732265) Visitor Counter : 336