रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज पुण्यात लस उत्पादन केंद्राला दिली भेट

Posted On: 02 JUL 2021 6:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय  बंदर, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) आणि रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय  यांनी लस उत्पादन प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि लसीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी आज पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लस उत्पादन  केंद्राला  भेट दिली. केंद्रीय औषधनिर्माण विभागाच्या सचिव  एस अपर्णा देखील यावेळी उपस्थित होत्या.

मांडवीय  यांनी महामारी दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पार पाडलेल्या उल्लेखनीय  भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार सर्वांसाठी लस सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सर्व लस विकासकांना आणि उत्पादकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे . त्यांनी उत्पादकाशी लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत  चर्चा केली.

नंतर, मांडवीय यांनी  पुणे येथील पिंपरी स्थित  हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि.  येथे  हात निर्जंतुकीकरण करणाऱ्या अल्कोहोलयुक्त उत्पादनाच्या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटनही केले.

या प्रसंगी ते  म्हणाले कीजिची  भारतात ही सुविधा उपलब्ध आहे अशी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. ही  एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कोविड -19 सह सर्व प्रकारचे संसर्ग कमी करणारे हे अल्कोहोल  बेस हँड रब निर्जंतुकीकरण आहे. ते पुढे म्हणाले की हे तयार करण्यासाठी प्रोपेनॉल बेस आणि इथेनॉल बेसवापरला आहे आणि सर्व प्रकारच्या विषाणू आणि जिवाणूंना मारण्यासाठी  अतिशय परिणामकारक आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732376) Visitor Counter : 236