गृह मंत्रालय

सरदार पटेल राष्ट्रीय एकता  पुरस्कार 2021 साठी 15 ऑगस्ट 2021 पर्यंत नामांकने पाठवता येणार

Posted On: 02 JUL 2021 6:03PM by PIB Mumbai

 

सरदार पटेल राष्ट्रीय एकता  पुरस्कार 2021 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारस प्रक्रिया सुरु झाली असून नामांकन/ शिफारस पाठवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2021  आहे.  नामांकन/शिफारस गृह मंत्रालयाच्या https://nationalunityawards.mha.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वीकारली जाईल.

भारताची एकता आणि अखंडता याविषयी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केंद्र सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने  सर्वोच्च नागरी पुरस्काराची स्थापना केली आहे.  राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या कार्याला  चालना देण्यासाठी आणि मजबूत  व अखंड भारताचे महत्व अधिक दृढ करण्यासाठी उल्लेखनीय आणि प्रेरणादायक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

धर्म, वंश, जात, लिंग, जन्म स्थान, वय किंवा व्यवसाय यांच्यात भेदभाव न करता भारताचा कोणताही नागरिक आणि कोणतीही संस्था/संघटना या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात.

भारतातील कोणतीही राष्ट्रीय संस्था किंवा संघटना या पुरस्कारासाठी एखादी  व्यक्ती किंवा संस्था किंवा संघटनेचे नाव सुचवू शकते. व्यक्ती/संस्था/संघटना स्वतःला देखील नामनिर्देशित करू शकतात.  राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि केंद्र  सरकारची मंत्रालयेही या पुरस्कारासाठी नामांकने  पाठवू शकतात.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732313) Visitor Counter : 213