अवजड उद्योग मंत्रालय
जागतिक स्पर्धात्मक उत्पादन भारतात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सहा तंत्रज्ञान नवोन्मेश प्लॅटफॉर्मचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले उद्घाटन
उच्च तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषामुळे राष्ट्राकरिता संपत्ती निर्माण होते, आपल्या गरजांच्या पूर्तेतेसाठी नावीन्यतेचा आधार घेऊन आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल केली पाहिजे- प्रकाश जावडेकर
Posted On:
02 JUL 2021 3:56PM by PIB Mumbai
केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे सहा तंत्रज्ञान नवोन्मेश प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. जागतिक स्पर्धात्मक उत्पादनासाठी भारतात तंत्रज्ञान विकसित करण्यावर यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म भारताची सर्व तंत्र संसाधने आणि संबंधित उद्योग क्षेत्र एका मंचावर आणण्यासाठी आणि भारतीय उद्योगासमोरच्या समस्या ओळखून त्यांचे व्यापक माध्यमातून निराकरण करण्यासाठी मदत होईल असे जावडेकर यांनी सांगितले.
यामुळे ग्रान्ड चॅलेन्जच्या माध्यमातून स्वदेशी मुख्य उत्पादन तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. यातूनच भारतात जागतिक स्पर्धात्मक उत्पादन क्षेत्र निर्मितीसाठी आणि आत्मनिर्भर भारत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहाय्य होणार आहे.
***
Jaydevi PS/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732299)
Visitor Counter : 306