गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) 72व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद


व्यवस्था चालवणाऱ्या यंत्रणेला कालसुसंगत प्रशिक्षण दिल्यावरच व्यवस्था बदलली जाऊ शकते असा पंतप्रधानांचा दृष्टीकोन – अमित शाह

Posted On: 01 JUL 2021 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) 72व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

IMG-4352__01

कुठल्याही संघटनेसाठी व्यवस्था अत्यंत महत्वाची असते, असे यावेळी अमित शाह म्हणाले. जेंव्हा संघटन चालवणारे लोक त्या व्यवस्थेचा भाग बनून व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतात त्याचवेळी संघटना यशस्वीपणे चालू शकते. व्यवस्था सुधारल्याने संघटनाही सुधारते आणि त्याचे आणखी उत्तम परिणाम आपल्याला दिसतात. म्हणूनच संघटनेला व्यवस्था केंद्रित करणे हाच यशाचा मूलमंत्र आहे, असे शाह यांनी सांगितले. ज्यावेळी आपण व्यवस्थेच्या यंत्रणेला आजच्या गरजांनुसार चालण्यासाठी प्रशिक्षित करतो त्याचवेळी व्यवस्था बदलली जाऊ शकते असा पंतप्रधानांचा दृष्टीकोन आहे. प्रशिक्षणाच्या काळातच समस्या दूर करण्याचे बीजारोपण केले जावे जेणेकरून व्यक्तीला जास्तीत जास्त जबाबदार आणि कर्तव्यतत्पर बनवले जाऊ शकेल, असे शाह म्हणाले. या प्रशिक्षणात व्यक्तीचा स्वभाव, काम करण्याची पद्धत 

IMG-4356

आणि एकूणच व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करण्याचे काम केले जाते. त्यामुळे हे प्रशिक्षण योग्य प्रकारे पूर्ण केले तर आयुष्यभर त्याचे फायदे होऊ शकतात असे शाह यांनी सांगितले.

IMG-4355

पोलिसांवर अनेकदा निष्क्रियता किंवा अतिसक्रीय असल्याचे आरोप केले जातात. या दोन्ही गोष्टी टाळून न्यायाच्या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करायला हवा असा सल्ला त्यांनी दिला. न्यायपूर्ण काम म्हणजे आपली कर्तव्ये पार पाडणे आणि कायदा समजून घेत त्यानुसार न्यायोचित कारवाई करणे हे आहे.

IMG-4357

पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले. त्यासाठी संवाद आणि संवेदना दोन्हीची आवश्यकता आहे. म्हणूनच पोलीस कर्मचाऱ्यांनी संवेदनशील होण्यासोबतच जनतेसोबत संवाद आणि संपर्क वाढविण्याची गरज आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी माहिती मिळणे जनसंपर्काशिवाय शक्य होऊ शकत नाही. म्हणूनच अधीक्षक आणि उप अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तालुक्यात गावात जाऊन लोकांना भेटले पाहिजे. तसेच आपल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद आणि सल्लामसलत करत राहायला हवे, असे शाह यांनी सांगितले.

IMG-4353
 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732089) Visitor Counter : 171