माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सामाजिक परिवर्तनासाठी विकास संप्रेषण, 8 व्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन पुरस्कारांचे विविध मानकरी


महाराष्ट्रातील नाशिक येथील रेडिओ विश्वासने शाश्वत मॉडेल पुरस्कारांमध्ये प्रथम आणि विशेष संकल्पना प्रकारात पटकावला द्वितीय पुरस्कार

Posted On: 30 JUN 2021 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2021

 

8व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार विजेत्यांची उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आनंद होत आहे.

समुदाय रेडिओ केंद्र त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे, श्रोत्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे समुदाय  रेडिओ केंद्र (सीआरएस) मधील नवकल्पना आणि निकोप स्पर्धांना प्रोत्साहित करण्यासाठी, माहिती आणि  प्रसारण मंत्रालयाने 2011-12 मध्ये राष्ट्रीय समुदाय  रेडिओ (सीआर) पुरस्कारांची सुरुवात केली.

8वे  राष्ट्रीय समुदाय  रेडिओ पुरस्कार

राष्ट्रीय समुदाय रेडिओ पुरस्कार सामान्यतः  दरवर्षी प्रदान केले जातात. आतापर्यंत 7 राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ  पुरस्कार  प्रदान करण्यात आले आहेत. 2020-21 या वर्षांसाठीच्या  8 व्या राष्ट्रीय समुदाय  रेडिओ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार खालील चार श्रेणीत  देण्यात आले :

i) विशेष संकल्पना पुरस्कार

ii) सर्वोत्कृष्ट अभिनव समुदाय सहभाग पुरस्कार

ii) स्थानिक संस्कृती  प्रोत्साहन पुरस्कार

iv) शाश्वत मॉडेल पुरस्कार

विशेष संकल्पना श्रेणीमधील द्वितीय पुरस्कार

शिक्षण सरस्वती कार्यक्रमासाठी, महाराष्ट्रातील नाशिक येथील विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि संशोधन संस्थेचा, रेडिओ विश्वास चा गौरव  

रेडिओ विश्वास 90.8 हे समुदाय  रेडिओ केंद्र महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे. हा रेडिओ या भागातील विविध समुदायांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रसारण करीत आहे. हे केंद्र  दररोज 14 तासांचे कार्यक्रम प्रसारित करीत आहे.

गरीब आणि वंचितांच्या मुलांना त्यांच्या पार्श्वभूमीमुळे शिक्षण मिळण्यासाठी उणीव भासू नये, हे सुनिश्चित करण्याचा शिक्षण सर्वांसाठी कार्यक्रमाचा उद्देश होता. विशेषतः पालिका शाळांमधील मुलांसाठी आणि ज्यांचे पालक स्थलांतरित कामगार आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता . कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान औपचारिक शिक्षणावर गंभीर परिणाम झाला. या मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होणे. या समस्येवर मात करण्यासाठी समुदाय रेडिओच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे  देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमधील 150 शालेय शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षकांना त्यांच्या विशेष नैपुण्याच्या आधारे विषय देण्यात आले.

सर्व वर्गांमधील  विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मजकूर तयार करण्यात आला. हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये प्रसारित झाला. विद्यार्थयांकडून या कार्यक्रमाला  मोठा प्रतिसाद मिळाला.

शाश्वत मॉडेल श्रेणीमध्ये  मध्ये प्रथम पुरस्कार

रेडिओ विश्वास, विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि संशोधन संस्था, नाशिक, महाराष्ट्र

नाशिकमधील रेडिओ विश्वास 90.8 हे समुदाय  रेडिओ केंद्र  स्थानिक  समुदायांसाठी  विविध कार्यक्रमांचे प्रसारण करीत आहे.रेडिओने त्याच्या कार्यान्वयनासाठी  शाश्वततेचे अभिनव मॉडेल स्वीकारले आहे. हळूहळू केंद्राने अर्थ, मनुष्यबळ, तांत्रिक आणि मजकूर विषयक शाश्वतता निश्चित केली आहे. 

खात्यातील पारदर्शकता आणि योग्य लेखापरीक्षण ठेवण्यासाठी , रेडिओ केंद्राने  मूळ संस्थेच्या खात्याशिवाय  स्वतंत्र बँक खाते ठेवले.आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकारी विभागांच्या सहकार्याने या केंद्राने  विविध प्रकल्प राबवले. केंद्राच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्मचार्‍यांची योग्यप्रकारे रचना करण्यात आली आहे. स्थानिक जाहिराती, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेला निधी याचा महसूल निर्मितीच्या मुख्य स्त्रोतात समावेश आहे. 2019-20 दरम्यान, या रेडिओ केंद्राने  50 नवीन कार्यक्रम प्रसारित केले. दहा वर्षांच्या कालावधीत, केंद्राशी  3 लाख श्रोते जोडले गेले आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1731727) Visitor Counter : 278