सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
संकल्पना-शाश्वत विकास उद्दिष्टे -2: उपासमार संपवणे, अन्न सुरक्षा साध्य करणे आणि पोषण सुधारणा आणि शाश्वत कृषीला प्रोत्साहन
Posted On:
29 JUN 2021 7:47PM by PIB Mumbai
दैनंदिन जीवनात सांख्यिकीचे महत्व लक्षात घेऊन आणि त्याचा वापर लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार महान सांखिकी तज्ञ दिवंगत प्राध्यापक पी सी महालनोबिस यांची जयंती 29 जून रोजी सांख्यिकी दिन म्हणून साजरी करत आहे.
सध्याचा कोविड -19 महामारी चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सांख्यिकी दिन 2021 आभासी पद्धतीने साजरा केला . मंत्रालयाच्या विविध सोशल मीडिया मंचावरून हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात आला. सांख्यिकी दिन 2021 साठी निवडण्यात आलेली संकल्पना -शाश्वत विकास उद्दिष्टे -2: उपासमार संपवणे, अन्न सुरक्षा साध्य करणे आणि पोषण सुधारणा आणि शाश्वत कृषीला प्रोत्साहन अशी आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री(स्वतंत्र कार्यभार) राव इंद्रजित सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी वर्च्युअल माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक विमल कुमार रॉय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव जी पी सामंथा, भारतीय सांख्यिकी संस्थेचे संचालक संघमित्रा बंडोपाध्याय यांनीही उपस्थितांना संबोधित केले. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी संदेश दिले. केंद्रीय, राज्य, केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि त्यांना सन्मानित करण्यात आले. अधिकृत सांख्यिकी मधील प्रा. पी् सी . महालनोबिस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष आर.बी. बर्मन, 45 वर्षांवरील सेवेतील अधिकृत सांख्यिकी श्रेणीतील प्रा. पी सी महालनोबीस राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर सीताभ्र सिन्हा, प्राध्यापक इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस चेन्नई यांना जाहीर झाला. युवा सांख्यिकी तज्ञ 2021 साठी प्राध्यापक सी आर राव राष्ट्रीय पुरस्कार कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर किरणमय दास यांना देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांख्यिकी संबंधी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ऑन द स्पॉट निबंध स्पर्धेच्या विजेत्यांनाही यावेळी गौरवण्यात आले.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731230)
Visitor Counter : 240