रेल्वे मंत्रालय
भविष्यकाळाची तयारी किंवा फ्युचर रेडी होण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेचे, एकूण 1,15,000 कोटी रु खर्चाचे 58 अति महत्वाचे तर 68 महत्वाचे प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे नियोजन
गर्दीच्या तसेच पूर्ण क्षमतेने वापरात असलेल्या रेल्वेमार्गावरील वाहतूक आणि सुरक्षेत वाढ तसेच अधिक प्रवासी वाहून नेण्याची व जास्तीत जास्त गाड्या चालवण्याची क्षमता वाढेल
जास्त वापर असणाऱ्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, तिहेरीकरण किंवा चौपदरीकरण या स्वरूपाचे प्रकल्प
Posted On:
29 JUN 2021 4:04PM by PIB Mumbai
भविष्याची तयारी किंवा फ्युचर रेडी होण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे 58 अत्यंत महत्त्वाचे आणि 68 महत्त्वाचे प्रकल्प पुढील काही वर्षात पूर्ण करत आहे. हे प्रकल्प एकूण 1,15,000 कोटी रुपये खर्चाचे आहेत.
कोविड-19 ने आव्हान उभे केले असतानाही भारतीय रेल्वे, रेल्वे मार्गांची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करत आहे.
गेल्या वर्षभरात 1,044 किमी मार्गावरील 11,588 कोटी रुपये खर्चाचे 29 अति महत्वाचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
रेल्वेची जास्तीत जास्त वाहतूक ही सुवर्ण चतुष्कोण, उच्च घनता असलेले रेल्वेचे जाळे आणि सर्वात जास्त वापर असणारे रेल्वे मार्ग या ठिकाणी एकवटलेली आहे.
त्यापैकी उच्च घनता असणाऱ्या तसेच सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या रेल्वे जाळ्यांची एकूण लांबी ही भारतीय रेल्वेच्या एकूण रेल्वे मार्गांच्या लांबीच्या 51% एवढी आहे परंतु रेल्वेची 96 टक्के वाहतूक या मार्गावरून होते.
वाहतुकीची घनता ,वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचे स्वरूप , धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे मार्ग यावर आधारित काही प्रकल्प अतिमहत्त्वाचे तर काही महत्वाचे अशा तऱ्हेने प्रकल्पांची विभागणी करण्यात आली. त्वरित पूर्णत्वाला नेण्याची गरज असलेले प्रकल्प तसेच अगोदर सुरू असलेले प्रकल्प अशा एकूण 58 प्रकल्पांची गणना अतिमहत्त्वाचे प्रकल्प म्हणून करण्यात आली. तर पुढील टप्प्यात पूर्ण होऊ शकतील अशा 68 प्रकल्पांची गणना महत्वाचे प्रकल्प म्हणून करण्यात आली.
तत्पर निधी पुरवठा आणि नियमित देखभाल यायोगे हे प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करण्याकडे लक्ष पुरवण्यात आले, जेणेकरून त्यातील गुंतवणुकीची फळे लवकरात लवकर मिळू शकतील.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर या गर्दीच्या तसेच पूर्ण क्षमतेने वापरात असलेल्या रेल्वेमार्गाची वाहतूक आणि सुरक्षा यांच्यात वाढ होईल. तसेच अधिक प्रवासी वाहून नेण्याची व जास्तीत जास्त गाड्या चालवण्याची क्षमता वाढेल.
अतिमहत्वाचे प्रकल्प:
एकूण 3,750 किलोमीटर रेल्वे मार्ग आणि 39,663 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प यामध्ये मोडतात. अतिमहत्वाचे प्रकल्प हे प्रामुख्याने मल्टी ट्रॅकिंग म्हणजेच रेल्वेमार्गाच्या आडव्या विस्ताराचे प्रकल्प आहेत . जास्त वाहतूक असणाऱ्या रेल्वे मार्गांवरील दुहेरीकरण तिहेरीकरण किंवा चौपदरीकरण अशा स्वरूपाचे हे प्रकल्प आहेत . आत्तापर्यंत एकूण 1,044 किलोमीटर लांबीचे आणि एकूण 11,588 कोटी रुपये खर्चाचे 29 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत .
डिसेंबर 2021 पर्यंत यातील सत्तावीस प्रकल्प पूर्ण होतील तर उरलेले दोन प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण होतील.
महत्वाचे प्रकल्प:
एकूण 6913 किलोमीटर लांबीचे आणि 75,736 कोटी खर्चांचे 68 महत्त्वाचे प्रकल्प भारतीय रेल्वेने हाती घेतले आहेत त्यापैकी 108 किलोमीटर अंतराचे चार प्रकल्प आत्तापर्यंत पूर्ण झाले आहेत . त्यांच्यावर Rs 1,408 कोटी रुपये खर्च झाला आहे. उरलेले प्रकल्प मार्च-2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तराखंड या राज्यांमध्ये भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी काही पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्र: जून 2019 मध्ये भारतीय रेल्वेने महाराष्ट्रात भुसावळ जळगाव तिहेरीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला. यामुळे या भागातील अडचण दूर होईल आणि मनमाड खांडवा तसेच भुसावळ उधना या पट्ट्यातील रेल्वे सेवांपुढील अडचणी दूर होऊन त्या सुरळीत होतील.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731147)
Visitor Counter : 275