उपराष्ट्रपती कार्यालय

आपल्या भाषांच्या संवर्धनासाठी जनचळवळ आवश्यक: उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू


राष्ट्रथर तेलुगू समख्याच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त उपराष्ट्रपतींचे संबोधन

Posted On: 27 JUN 2021 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2021


आपल्या भाषेच्या परंपरांचा लाभ येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने, भाषा संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांना पूरक जनचळवळीच्या आवश्यकतेवर  उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकैया  नायडू यांनी आज भर दिला

पिढ्यांना आणि भौगोलिकदृष्ट्या लोकांना एकत्र आणण्यासाठी भाषेचे सामर्थ्य अधोरेखित करत श्री. नायडू यांनी, आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी, त्या समृद्ध होण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सहाव्या वार्षिक ‘राष्ट्रथर तेलुगू समख्या ’ परिषदेत बोलताना , श्री नायडू यांनी सुचवले की ,तेलुगू भाषेच्या आणि आपल्या स्थानिक परंपरांच्या पुनरुज्जीवनासाठी तेलगू भाषकांनी एकत्र यायला हवे.

भाषेकडे दुर्लक्ष केल्यास तिची अधोगती होईल हे लक्षात घेता, उपराष्ट्रपतींनी असा सल्ला दिला की, अन्य भाषा आणि संस्कृतींचा अनादर न करता आपली मातृभाषा आणि संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या कल्पनेनुसार  मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची गरज श्री.नायडू यांनी अधोरेखित केली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्य न्यायाधीश यांच्यासह देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांवर  सध्या कार्यरत असलेल्या व्यक्तींचे प्राथमिक शिक्षण  मातृभाषेत झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाषेच्या समृद्ध परंपरेचा प्रसार करण्याच्या दृष्टीने, तेलुगू साहित्याचा अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी आणखी पुढाकार घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. 

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730722) Visitor Counter : 229