आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2021 9:21AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात 30.79 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतात गेल्या 24 तासांत 60.73 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
देशात गेल्या 24 तासांत 51,667 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन आता ही संख्या 6,12,868 झाली आहे.
आतापर्यंत देशभरात एकूण 2,91,28,267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 64,527 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 43 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे .
रोगमुक्तीचा दर वाढून आता 96.66 % झाला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सातत्याने 5% पेक्षा कमी असल्याचे दिसून येत असून सध्या हा दर 3% इतका आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.98 % इतका असून सलग 18 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.
कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ- आतापर्यंत एकूण 39.95 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
****
UU/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1730250)
आगंतुक पटल : 233