आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
24 JUN 2021 9:22AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधक लसीच्या 30 कोटी 16 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतात गेल्या 24 तासांत लसीच्या 64 लाख 89 हजार मात्रा देण्यात आल्या.
देशात गेल्या 24 तासांत 54,069 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन आता ही संख्या 6,27,057 झाली आहे.
आतापर्यंत देशात एकूण 2,90,63,740 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत 68,885 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले.
एका दिवसात कोविडमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 42 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त होती.
रोगमुक्तीचा दर वाढून आता 96.61% झाला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सातत्याने 5% पेक्षा कमी असल्याचे दिसून येत असून सध्या हा दर 3.04% आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.91% इतका असून सलग 17 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.
कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ- आतापर्यंत एकूण 39 कोटी 78 लाख चाचण्या करण्यात आल्या.
****
UU/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729961)
अभ्यागत कक्ष : 264
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam