पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 24 जून रोजी टॉयकेथॉन -2021 च्या सहभागींशी साधणार संवाद
Posted On:
22 JUN 2021 12:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टॉयकेथॉन -2021 मधील सहभागींशी संवाद साधणार आहेत.
शिक्षण मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, डीपीआयआयटी, वस्त्रोद्योग मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि एआयसीटीई यांनी संयुक्तपणे 5 जानेवारी 2021 रोजी नाविन्यपूर्ण खेळणी आणि खेळांना चालना देण्यासाठी टॉयकेथॉन -2021 सुरू केले. टॉयकेथॉन -2021 साठी देशभरातील सुमारे 1.2 लाख सहभागींनी नोंदणी केली आणि 17000 पेक्षा अधिक कल्पना सादर केल्या, त्यापैकी 1567 कल्पनांची 22 ते 24 जून दरम्यान होणाऱ्या तीन दिवसांच्या ऑनलाईन टॉयकेथॉन ग्रँड फिनालेसाठी निवड करण्यात आली आहे. कोविड -19 निर्बंधामुळे या ग्रँड फिनालेमध्ये डिजिटल टॉय कल्पना मांडणारे संघ असतील, तसेच बिगर- डिजिटल टॉय संकल्पनांसाठी स्वतंत्रपणे प्रत्यक्ष स्वरूपात कार्यक्रम आयोजित केला जाईल.
भारताची स्थानिक बाजारपेठ तसेच खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादन क्षेत्राला मोठी संधी आहे. टॉयकेथॉन -2021 चा उद्देश खेळण्याच्या बाजारपेठेत व्यापक हिस्सा प्राप्त करून खेळणी उद्योगाला चालना देणे हा आहे.
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
****
STupe/SKane/CYadav
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729340)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam