आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड लसीकरण मोहीम अद्ययावत माहिती –157 वा दिवस

कोविड-19 लसीकरणाच्या नव्या टप्प्याला आजपासून देशभरात सुरुवात; एकाच दिवसांत 80 लाखांपेक्षा अधिक लसींच्या मात्रा देण्याचा भारताचा विक्रम

Posted On: 21 JUN 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2021

 

कोविड-19 ची लस सर्व पात्र नागरिकांना मोफत देण्याचा नवा टप्पा आजपासून देशभरात सुरु झाला. आज पाहिल्याच दिवशी या लसीकरण मोहिमेत विक्रमी यश मिळवत, भारताने सुमारे 81 लाख लोकांना (80,95,314) लसींच्या मात्रा देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जून 2021 रोजी या लसीकरण मोहिमेच्या नव्या टप्प्याची घोषणा केली होती.

देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. लसींची उपलब्धता वाढवणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होणाऱ्या लसींची आगावू माहिती देणे, जेणेकरून त्यांना पुढचे नियोजन सुव्यवस्थितपणे आखता येईल. आणि लस पुरवठा साखळी अधिक सुनियोजित करणे अशा उपायांतून लसीकरण मोहिमेला आणखी गती देण्यात आली.

मे 2021 मध्ये, देशभरात  कोविड लसीकरणासाठी 7.9 कोटी लसींच्या मात्रा उपलब्ध होत्या.जून महिन्यात ही संख्या 11.78 कोटी मात्रांपर्यंत वाढवण्यात आली. यात केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिल्या जाणाऱ्या लसींचा तसेच खाजगी रुग्णालयांकडून थेट खरेदी करण्यात आलेल्या लसींचाही समावेश आहे.

राज्यांना जून महिन्यात दिल्या जाणाऱ्या लसींच्या संख्येविषयी त्यांना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून आगाऊ माहिती देण्यात आली होती. या आगाऊ माहितीमुळे राज्यांना आपल्या जिल्हानिहाय तसेच कोविड लसीकरण केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या लसींचे योग्य नियोजन करता आले.  यामुळे, देशभरात, लसीकरण कार्यक्रमाला गती मिळाली

खालील तक्त्यात, आज देण्यात आलेल्या लसींच्या मात्रांची राज्य निहाय सविस्तर आकडेवारी आहे.

State/UT

Today

Andaman and Nicobar Islands

783

Andhra Pradesh

47328

Arunachal Pradesh

12892

Assam

330707

Bihar

470352

Chandigarh

6738

Chhattisgarh

84638

Dadra and Nagar Haveli

4176

Delhi

76216

Goa

15586

Gujarat

502173

Haryana

472659

Himachal Pradesh

98169

Jammu and Kashmir

32822

Jharkhand

82708

Karnataka

1067734

Kerala

261201

Ladakh

1288

Lakshadweep

289

Madhya Pradesh

1542632

Maharashtra

378945

Manipur

6589

Meghalaya

13052

Mizoram

17048

Nagaland

9745

Odisha

280106

Puducherry

17207

Punjab

90503

Rajasthan

430439

Sikkim

11831

Tamil Nadu

328321

Telangana

146302

Tripura

141848

Uttar Pradesh

674546

Uttarakhand

115376

West Bengal

317991

Daman and Diu

4374

Total

80,95,314

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1729250) Visitor Counter : 73