शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री संजय धोत्रे 22 जून रोजी होणाऱ्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार
Posted On:
20 JUN 2021 8:24PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे 22 जून 2021 रोजी होणाऱ्या जी-20 गटसदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ते त्याच दिवशी जी-20 गटसदस्य देशांच्या शिक्षण तसेच श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीलासुद्धा उपस्थित राहतील.
या दोन्ही बैठका संयुक्तरीत्या इटलीच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या आहेत भारत या बैठकीत दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभागी होणार आहे.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728862)
Visitor Counter : 167