श्रम आणि रोजगार मंत्रालय
किमान वेतन आणि राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करण्याबाबत तज्ञ गट लवकर अहवाल देणार
Posted On:
19 JUN 2021 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
केंद्र सरकारला किमान वेतन व राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करण्याबाबत तांत्रिक माहिती व शिफारसी देण्यासाठी केंद्र सरकारने प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अजित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ गट स्थापन केला आहे. तज्ञ समूहाचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. सरकारकडून किमान वेतन आणि राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करण्यास विलंब केला जात असल्याचे मत माध्यमातील काही घटकांनी आणि काही हितधारकांनी मांडले होते असे आढळून आले आहे.
हे स्पष्ट करण्यात येत आहे की सरकारचा असा कोणताही हेतू नाही आणि तज्ञ गट लवकरात लवकर आपल्या शिफारशी सरकारला सादर करेल. तज्ञ समूहाचा कार्यकाळ तीन वर्षे ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन किमान वेतन व राष्ट्रीय किमान वेतन निश्चित झाल्यानंतरही जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सरकार तज्ञ गटाकडून किमान वेतन आणि राष्ट्रीय किमान वेतनाशी संबंधित विषयांवर सल्ला/माहिती मागवू शकेल. या गटाची पहिली बैठक 14 जून 2021 रोजी झाली आणि दुसरी बैठक 29 जून, 2021 रोजी होणार आहे.
* * *
S.Tupe/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728524)
Visitor Counter : 155