सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांगजनांसाठी गुजरातमधील जामनगर येथे उद्या आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक अधिकारता शिबिरात' 3805 दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणे प्राप्त होणार

Posted On: 19 JUN 2021 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021

 

गुजरातमधील जामनगर येथे उद्या कोविड -19 महामारीच्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करून आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक अधिकारता शिबिरात’ ब्लॉक/ पंचायत स्तरावरील 3805 दिव्यांगजनांना, 3 कोटी 57 लाख रुपये किमतीच्या एकूण 6225 साधनांचे आणि सहाय्यक उपकरणांचे, मोफत वाटप केले जाईल.

या शिबिराचे आयोजन दिव्यांगजन सबलीकरण विभाग (डीईपीडब्ल्यूडी) आणि अलिम्को तसेच सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने दिव्यांगजनांना विविध उपकरणे आणि सहाय्यक साधनांचे वितरण करणाऱ्या विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

या समारंभाच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी द्रुकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित राहतील. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ.थावरचंद गेहलोत हे या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

 

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728517) Visitor Counter : 152