विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सेन्सिट रॅपिड कोविड -19 एजी किट

Posted On: 19 JUN 2021 9:19AM by PIB Mumbai

सध्या कोविड -19 महामारीचा संपूर्ण जगावर तीव्र परिणाम झाला आहे. कोविड -19 संसर्गा दरम्यान उद्भवणाऱ्या लक्षणांची तीव्रता कधीकधी लक्षात न येणारी असते तर कधीकधी जीवघेणीही असू शकते. जलद चाचणी प्रक्रियेमध्ये अँटीजेन चाचणीचा समावेश असतो जी थोड्या अवधीतच शेकडो नमुन्यांचे निष्कर्ष प्रदान करते. अशा जलद चाचण्या आपल्या देशातील नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. अनेक नवसंशोधक आणि उद्योजक अथक परिश्रम घेत असून अशा कठीण परिस्थितीत केवळ आरोग्य कामगारांसाठी नाही तर देशातील जैव-तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना देण्यासाठी अचूक, परवडणारी व सुलभ चाचणी किट विकसित करत आहेत.

कोविड -19 रिसर्च कन्सोर्टियम अंतर्गत डीबीटी-बीआयआरएसीद्वारा समर्थन मिळालेले ‘सेन्सिट रॅपिड कोविड -19 एजी किट’ यूबिओ बायोटेक्नॉलॉजी सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे. याद्वारे सार्स सीओव्ही -2 न्यूक्लियोकॅप्सीड प्रोटीनचा गुणात्मक शोध 15 मिनिटांत घेता येतो. संशयित व्यक्तीकडून नासोफरींजियल स्वॅब्स वापरुन नमुने गोळा केले जातात. हे आयसीएमआर मान्यताप्राप्त किट क्रोमॅटोग्राफिक इम्युनोसे आहे, जे आरोग्य कर्मचार्‍यांना चाचणीचे परिणाम डोळ्यांनी वाचू देतात. ही चाचणी सँडविच इम्युनोसेच्या तत्त्वावर कार्य करते आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या जोडीचा उपयोग करते जे कोविड19 विशिष्ट अँटीजेन परिणामात रंगीत रेषेच्या रूपात आढळून येते. किट 86% संवेदनशीलता आणि 100% विशिष्टता दर्शवते आणि ते 24 महिने चालते. सेन्सिट रॅपिड कोविड -19 एजी किटचे यशस्वीपणे व्यापारीकरण करण्यात आले आहे.

अशा जलद चाचण्यांमुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांना संक्रमित व्यक्तींचा त्वरित शोध घेणे शक्य होते, त्यांचा वेळ वाचतो आणि संक्रमित व्यक्तीला चांगला सल्ला आणि उपचार देता येतात.

अधिक माहितीसाठी: डीबीटी/बीआयआरएसी च्या ई-कम्यूनिकेशन विभागाशी संपर्क साधा

 

@DBTIndia@BIRAC_2012

www.dbtindia.gov.in

www.birac.nic.in

www.dbtindia.gov.in

www.birac.nic.in

***

STupe/Skane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728490) Visitor Counter : 226