PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
18 JUN 2021 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 18 जून 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात उपचाराधीन रुग्णसंख्येत घट होऊन ही संख्या 7,98,656 झाली आहे, 73 दिवसांनी ही संख्या 8 लाखापेक्षा कमी
गेल्या 24 तासात देशात 62,480 नव्या रुग्णांची नोंद
देशात आतापर्यंत एकूण 2,85,80,647 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 88,977 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या, सलग 36 व्या दिवशी जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर 96.03%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 3.80%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 3.24%,सलग 11 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत वाढ, एकूण 38.71कोटी चाचण्या करण्यात आल्या.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत 26.89 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
इतर अपडेट्स :
- देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. केंद्र सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वपूर्ण उपाय आहे. कोविड लसीकरणाच्या, व्यापक आणि गतिमान धोरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला, दिनांक 1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आज दुरदृष्य प्रणालीद्वारे आरंभ केला. 26 राज्यात 111प्रशिक्षण केंद्रांवर हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एक लाख फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या सह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री, तज्ञ आणि इतर संबंधित यावेळी उपस्थित होते.
- कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली.
- सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत, भारतीय रेल्वेने देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचा आपला प्रवास जारी ठेवला आहे.ऑक्सिजन एक्सप्रेसने देशसेवेत 32,000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचवण्याचा टप्पा पार केला आहे.
- कामगारांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले . महामारीच्या काळात कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी केलेल्या अनेक उपाययोजनांचे तपशीलवार माहितीपत्रक आज प्रसिद्ध करताना ते म्हणाले की, ज्या लोकांसाठी या सुविधा तयार केल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे . सरकारला देशातील सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहे. गरज पडल्यास कामगारांचे आरोग्य व जीवनाचे रक्षण करण्यासाठी मंत्रालय हर तऱ्हेने मदत पुरवेल असे ते म्हणाले.
- भारताची सर्वोच्च वैज्ञानिक संशोधन संस्था सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्र आणि टाटा समूहाचा आरोग्य सेवेतील उपक्रम टाटा एमडी यांनी देशभरातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये कोविड 19 चाचणी क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. सीएसआयआर आणि टाटा एमडी भविष्यातली कोविड -19 चाचण्यांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही क्षमता विकसित करत आहेत.
- 16 जून 2021रोजी म्युकरमायकोसीसचे 27,142 सक्रीय रुग्ण होते, काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले तरीही म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी अॅम्फोटेरिसिन बी आणि इतर औषधांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त उपलब्धतेसाठी भारत सज्ज आहे. भारताने देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय पाचपट वाढ केली आहे. एप्रिल 2021 मध्ये लायपोसोमाल अॅम्फोटेरिसिन बी औषधाचे देशांतर्गत उत्पादन केवळ 62,000 कुप्या होते, आता जून 2021 मध्ये 3.75 लाखापेक्षा जास्त कुप्यांचे उत्पादन अपेक्षित आहे.
- सध्याची कोरोना महामारी लक्षात घेता, जेष्ठ नागरिकांचे जीवनमान सुलभ होण्याच्या दृष्टीने महत्वाची सुधारणा करत, निवृत्तीवेतन त्वरेने वितरीत करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. निवृत्तीवेतन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा जोडीदार किंवा कुटुंबातल्या सदस्यांची, अनावश्यक तपशील आणि कागदपत्रे यासाठी गैरसोय होऊ नये आणि निवृत्तीवेतन लवकरात लवकर वितरीत करण्यात यावी अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र अपडेट्स:-
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 9830 नवीन कोविड -19 बाधित रुग्णांची नोंद झाली. 5890 जणांना घरी सोडण्यात आले तर 236 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 1,39,960 उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यातील कोविडशी संबंधित म्युकरमायकोसिस रुग्णांपैकी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिकमध्ये एकत्रितपणे 57% रुग्णांची नोंद झाली आहे.
गोवा अपडेट्स:-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोविड19 मुळे ज्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे अशा छोटे उद्योग व्यावसायिक, पारंपारिक व्यवसाय करणारे , मनरेगा कामगार आणि इतर स्वयंरोजगार करणाऱ्यांना 5,000 रुपयांची एक वेळची मदत जाहीर केली. ते म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबांपैकी जिथे कमावत्या सदस्याचा मृत्यू झाला आहे त्यांना 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्याबाबत अर्जही उपजिल्हाधिकाऱ्यांकडे 8 दिवसात उपलब्ध होतील. राज्यात गुरुवारी 254 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3824 आहे.
M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728363)
Visitor Counter : 222