आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण –अद्ययावत स्थिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 27.90 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा पुरवण्यात आल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे, अद्याप 2.58 कोटी लसींच्या मात्रांचा साठा शिल्लक
Posted On:
18 JUN 2021 11:17AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. केंद्र सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वपूर्ण उपाय आहे.
कोविड लसीकरणाच्या, व्यापक आणि गतिमान धोरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला, दिनांक 1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.
या धोरणाअंतर्गत, दर महिन्याला, कोणत्याही लस उत्पादकाकडून एकूण उत्पादित आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळेने मंजुरी दिलेल्या लसींपैकी 50 टक्के लसी, केंद्र सरकार खरेदी करत आहे. या लसींची खरेदी पुढेही सुरु राहणार असून, पूर्वीप्रमाणेच या लसींचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केला जाणार आहे.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 27.90 कोटींहून अधिक (27,90,66,230) लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून (मोफत लस पुरवठा पध्दतीने) तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
यापैकी, राज्यांनी वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह एकूण 25,32,65,825 लसींच्या मात्रांचा वापर केला आहे.(ही आकडेवारी आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या अहवालावर आधारित आहे.)
2.58 कोटींहून अधिक (2,58,00,6,405) कोविड लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहे.
तसेच 19,95,770 लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याचे काम सुरू असून पुढील तीन दिवसांत त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांना मिळतील.
***
HFW/ कोविड राज्यनिहाय स्थिती /18 thJune 2021/2
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728158)
Visitor Counter : 215
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam