विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर लॅबच्या नेटवर्कचा वापर करून देशभरात कोविड 19 रुग्णांचा शोध अधिक सुलभ करण्यासाठी सीएसआयआर आणि टाटा एमडी यांची भागीदारी

Posted On: 18 JUN 2021 5:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

भारताची सर्वोच्च वैज्ञानिक संशोधन संस्था सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्र आणि टाटा समूहाचा आरोग्य सेवेतील उपक्रम टाटा एमडी यांनी देशभरातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये कोविड 19 चाचणी क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. सीएसआयआर आणि टाटा एमडी भविष्यातली कोविड -19 चाचण्यांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ही क्षमता विकसित करत आहेत.

हा उपक्रम सीएसआयआरच्या देशभरातील प्रयोगशाळांच्या नेटवर्कचा वापर करून देशातील छोट्या ठिकाणी भारताची चाचणी क्षमता वाढवण्यास मदत करेल. सीएसआयआर आणि टाटा एमडी संयुक्तपणे चाचणी क्षमता विकसित करतील आणि टाटा एमडी चेक सार्स -सीओव्ही -2 चाचणी किट वापरून आरटी-पीसीआर सीआरआयएसपीआर चाचणी केली जाईल ज्यात सीएसआयआर-आयजीआयबीचे एफईएलयुडीए (फेलूडा) तंत्रज्ञान वापरले जाईल.

लसीकरणाव्यतिरिक्त, वेगवान चाचणी आणि सार्स -सीओव्ही -2 बाधित व्यक्तींचे अलगीकरण हे कोविड -19 विरूद्ध लढा देण्यासाठी सर्वोत्तम धोरण म्हणून उदयाला आले आहे. टाटा एमडी यांच्या भागीदारीतून देशभरातील अनेक सीएसआयआर लॅबमध्ये आरटी-पीसीआर सीआरआयएसपीआर चाचणी उपलब्ध करून देणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे कोविड चाचणी घेण्याची आणि स्थानिक पातळीवर त्याचा शोध घेण्याची राष्ट्रीय क्षमता वाढेल असे सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी सांगितले.

टाटा एमडी राज्यातील चाचणी क्षमता वाढवण्यासाठी एंड-टू-एंड, ऑन साइट कोविड -19 चाचणी घेणारी  3-खोल्यांची डिझाइन मोबाईल टेस्टिंग लॅबदेखील तैनात करत आहे.

सीएसआयआरच्या प्रयोगशाळा नेटवर्कशी भागीदारी करून आणि संपूर्णपणे सुसज्ज मोबाईल प्रयोगशाळा तैनात करून आम्ही जलद आणि मापन करता येतील अशा  पद्धतींचा वापर करून चाचणी क्षमता वेगाने वाढवू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. यामुळे चाचण्यांची व्यापक उपलब्धता आणि सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्याच्या राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल असे टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गिरीश कृष्णमूर्ती म्हणाले.

टाटा एमडी सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह कोविड 19 चाचणी उपाय प्रदान करते-

टाटा एमडी चेक सार्स-सीओव्ही -2 चाचणीः  सीएसआयआर-आयजीआयबीच्या फेलुडा तंत्रज्ञानाद्वारे पेपर स्ट्रिप आधारित आरटी-पीसीआर सीआरआयएसपीआर चाचणीला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे. ती अतिशय सोपी असून अगदी अचूक आहे आणि यासाठी थर्मोसायक्लर्स सारखी मानक प्रयोगशाळा उपकरणे आवश्यक आहेत.

टाटा एमडी स्वयंचलित चाचणी - टाटा एमडी चेक स्वयंचलित चाचणीमुळे चाचणी क्षमता अनेक पटीने वाढू शकते ज्यामध्ये संसर्ग होत नाही.

टाटा एमडी मोबाईल टेस्टिंग लॅब- टाटा एमडीने लोवे आणि  युनाइटेड वे सह भागीदारी केली असून षण्मुखा एमआयटीने तयार केलेली 3 खोल्या असलेली डिझाइन मोबाईल टेस्टिंग लॅब तैनात करत आहे. यामुळे ऑन साईट चाचणी क्षमता वाढविण्यासाठी मदत होईल.

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेड (टाटा एमडी) बद्दल माहिती :

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेड (टाटा एमडी), हा टाटा समूहाच्या मालकीचा आरोग्य क्षेत्रातील उपक्रम असून ग्राहकांना आरोग्यसेवा सहजतेने पुरवण्यासाठी आधुनिक आणि रुग्ण-केंद्रित निदान सेवा प्रदान करणे हे उद्दिष्ट  आहे.

2020 मध्ये महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या टाटा एमडीने टाटा एमडी CHECK विकसित केले आणि जगातील पहिली व्यावसायिकरीत्या उपलब्ध  सीआरआयएसपीआर कॅस -9 आधारित कोविड 19  चाचणी सुरु केली आहे. सीएसआयआर-आयजीआयबी या आघाडीच्या जैव विज्ञान संशोधन संस्थेचे फेलूडा तंत्रज्ञान यात वापरले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:

निकिता क्रस्टा, +91 9821071527,nikita.crasta@adfactorspr.com

अभिजित गानू  +91 9769268386,abhijit.ganu@adfactorspr.com

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728236) Visitor Counter : 466