रेल्वे मंत्रालय
देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांना ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे सुमारे 17700 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू वितरित
देशसेवेसाठी ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे सुमारे 32000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा
आतापर्यंत द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूच्या 1834 टॅन्कर्सची वाहतूक करत ऑक्सिजन एक्सप्रेसने दिला 15 राज्यांना दिलासा
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2021 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2021
सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत, भारतीय रेल्वेने देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचा आपला प्रवास जारी ठेवला आहे.
ऑक्सिजन एक्सप्रेसने देशसेवेत 32,000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचवण्याचा टप्पा पार केला आहे.
भारतीय रेल्वेने आतापर्यंत, सुमारे 32095 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू देशभरातल्या विविध राज्यात 1834 हून अधिक टँकरद्वारे वितरित केला आहे.
444 ऑक्सिजन एक्सप्रेसनी आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.
हे पत्रक जारी होईपर्यंत 258 मेट्रिक टनहून अधिक द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचे 14 टँकर घेऊन 3 ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत होत्या.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने 55 दिवसांपूर्वी 24 एप्रिलला महाराष्ट्रात 126 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचवून सुरुवात केली ही उल्लेखनीय बाब आहे.
प्राणवायूसाठी विनंती करणाऱ्या राज्यांना अतिशय कमी वेळात शक्य तितका जास्त द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पुरवण्याचे भारतीय रेल्वेचे अभियान आहे.
उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगण, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्प्रेसने प्राणवायूची मदत पोहोचवली आहे.
हे प्रसिद्धीपत्रक जारी होईपर्यंत महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात सुमारे 3797 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 656 मेट्रिक टन, दिल्लीत 5722 मेट्रिक टन, हरियाणामध्ये 2354 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 98 मेट्रिक टन, कर्नाटकमध्ये 4227 मेट्रिक टन, मेट्रिक टन, उत्तराखंड मध्ये 320 मेट्रिक टन, तामिळनाडू मध्ये 5674 मेट्रिक टन, आंध्रप्रदेशमध्ये 4037 मेट्रिक टन, पंजाबमध्ये 225 मेट्रिक टन, केरळमध्ये 513 मेट्रिक टन, तेलंगणमध्ये 3255 मेट्रिक टन, झारखंड मध्ये 38 मेट्रिक टन आणि आसाममध्ये 560 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचवण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा स्थानापासून वेगवेगळ्या मार्गांचे मॅपिंग करत राज्यांच्या मागणीसाठी स्वतःला सज्ज ठेवले आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसचे मार्गक्रमण सुरु राहावे यासाठी रेल्वे मार्ग मोकळे ठेवण्याबरोबरच अत्युच्च दक्षता बाळगण्यात येते.
याचबरोबर मालवाहतुकीचा वेग कमी होणार नाही याची काळजीही घेतली जाते.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1728242)
आगंतुक पटल : 301