सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने उद्योग आधार कराराची वैधता 31 मार्च 2021 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली

Posted On: 17 JUN 2021 7:19PM by PIB Mumbai

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने 26.06.2020 रोजी जारी  केलेल्या  मूळ अधिसूचना क्रमांक एस.ओ. 2119 (ई ) मध्ये सुधारणा केली आहे. सुधारित अधिसूचना 2347 (ई) 16.06.2021 रोजी जारी करण्यात आली असून यानुसार उद्योग करार ईएम भाग -2 आणि उद्योग आधार कराराची  वैधता 31.03.2021 ते 31.12.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ईएम भाग -२ आणि उद्योग आधार करार धारकांना विद्यमान योजनांमधील तरतुदींचा लाभ  घेणे सुलभ होईल  आणि एमएसएमईच्या प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देण्याच्या सुविधांसह प्रोत्साहनपर लाभ  मिळू शकेल.

 

सध्या असलेल्या कोविड --19  परिस्थितीत एमएसएमईला येणाऱ्या अडचणी आणि  एमएसएमई क्षेत्राच्या हिताशी संबंधित विविध एमएसएमई संघटना, वित्तीय संस्था आणि सरकारी विभागांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली आहे.

 

विद्यमान ईएम भाग - 2 आणि उद्योग आधार सामंजस्य करार धारक 1 जुलै, 2020,रोजी सुरू झालेल्या उद्यम  नोंदणीच्या नव्या यंत्रणेकडे नोंदणी  करण्यास पात्र असतील.त्याचप्रमाणे  शासकीय योजनांचा लाभ मिळवून  एमएसएमई बळकट करण्याचा आणि त्यांच्या गतिमान पुनर्लाभाचा   त्यांच्या आर्थिक उपक्रमांना  आणि रोजगार निर्मितीला  चालना देण्याचा मार्ग सुकर  होईल, अशी अपेक्षा आहे 

 

इच्छुक उद्योजक https://udyamregmission.gov.in वर विनामूल्य आणि कोणत्याही दस्तऐवजाशिवाय नोंदणी करु शकतात.उद्यम  पोर्टलवर नोंदणीसाठी फक्त पॅन आणि आधार आवश्यक आहे. आतापर्यंत या पोर्टलने 17.06.2021 (5.26.43 PM) पर्यंत 33,16,210 उद्योगांची नोंदणी आणि वर्गीकरण सुलभ केले आहे.

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728046) Visitor Counter : 250