Posted On:
16 JUN 2021 9:02PM by PIB Mumbai
- India's Active Caseload declines to 8,65,432
- Less than 9 lakh Active Cases after 70 days
- India reported 62,224 daily new cases in the last 24 hours
- 2,83,88,100 Total Recoveries across the country so far
- 1,07,628 patients recovered during last 24 hours
- Daily recoveries continue to outnumber Daily New Cases for 34th consecutive day
- Recovery Rate increases to 95.80%
- Weekly Positivity Rate drops to less than 5%, currently at 4.17%
- Daily positivity rate at 3.22%, less than 5% for 9 consecutive days
- Testing capacity substantially ramped up – 38.33 cr tests total conducted
- 26.19 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona



नवी दिल्ली/मुंबई, 16 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे "कोविड-19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा" प्रारंभ करणार आहेत.
प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहायता आणि मदत निधी (पीएम केअर्स) फंड ट्रस्टने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कल्याणी येथे डीआरडीओच्या वतीने 250 बेड्स असलेली 2 तात्पुरती कोविड रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
देशात कोविडचे दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या 24 तासात देशात 62,224 इतकी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून 1 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद आहे. हे केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सततच्या आणि सहयोगी प्रयत्नांचे परिणाम आहेत.
देशात उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 8,65,432 इतकी आहे. 70 दिवसानंतर रुग्णसंख्या 9 लाखांपेक्षा कमी आली आहे. गेल्या 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत 47,946 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 2.92 टक्के आहेत.
कोविड-19 च्या संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग 34 व्या दिवशीही जास्त आहे. गेल्या 24 तासात1,07,628 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. दैनंदिन नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत 45 हजारांहून अधिक (45,404) रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत.
आतापर्यंत देशातील 2,83,88,100 व्यक्ती कोरोनामधून बर्या झाल्या असून गेल्या 24 तासात 1,07,628 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरीत चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात 19,30,987 चाचण्या करण्यात आल्या असून देशात आतापर्यंत सुमारे 38.88 कोटी (38,33,06,971) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्या वाढवत असतानाच साप्ताहित पॉझिटिव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 4,17 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 3.22 % इतका आहे. सलग 9 व्या दिवशी हा 5% पेक्षा कमी आहे.
आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार, भारताने 26 कोटी मात्राचा लसीकरण करण्याचा टप्पा काल गाठला आहे. एकूण 36,17,009 सत्रांमधून 26,19,71,014 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांमध्ये 28,00,458 इतक्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट:
कोरोना कालावधीत ज्यांनी आपले पालक गमावले आहेत त्या मुलांना महाराष्ट्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल आणि अशा मुलांना 5 लाख रुपयांचे साहाय्य करणार आहे. प्रत्येक अनाथ मुलाचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. काल महाराष्ट्रामध्ये 9,350 नवे कोरोना रुग्ण आढळले. 15,176 रुग्ण कोरोनातून बरे झाले.तर 388 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
गोवा अपडेट:
गोव्यात 1,314 नवे कोरोनाबाधित आढळले तर 3,793 रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चालना देण्यासाठी लस उत्सव 3.0 (चालू मोहीम) सुरु करण्यात आला आहे.
Important Tweets
* * *
M.Chopade/D.Rane