आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले
सर्वांगीण आरोग्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी योगाचे अपरिमित योगदान लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत योगाभ्यास नेणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे"
योगाचा स्वीकार करून मानवजातीला मिळणारे संभाव्य फायदे जगभरातील देशांनी ओळखले आहेत- डॉ हर्ष वर्धन
Posted On:
15 JUN 2021 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2021
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 च्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक उपस्थित होते. 21 जून 2021 रोजी 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन असून त्याचे औचित्य साधून आयुष मंत्रालय, केंद्र सरकार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्या सहकार्याने 'मोक्षयतन योगसंस्थान' द्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की जेव्हा जग मानवजातीसाठी सर्वांगीण आरोग्य आणि कल्याणविषयी बोलते , तेव्हा आपल्या प्राचीन योगसाधनेचा उल्लेख नेहमीच केला जातो. “जगभरात योगाभ्यासाची वाढती मान्यता हा त्याच्या व्यापक लोकप्रियतेचा पुरावा आहे. सध्याच्या महामारीच्या काळातही शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर देताना अनेकजण योगाकडे वळले आहेत, ” असे ते म्हणाले.
यावर्षी योग दिनाचे (योगासने करा, घरी रहा) या केंद्रीय संदेशाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “या जागतिक आरोग्यसंबंधी आपत्कालीन परिस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने एकत्रित कार्यक्रमांच्या आयोजनाचा विचार शक्य नाही.
योगाने सार्वजनिक व्यवहारांवर निर्बंध असताना लोकांना कशी मदत केली यावर डॉ. हर्ष वर्धन यांनी भर दिला. ते म्हणाले, “आपल्या देशाच्या या मौल्यवान वारशाला जागतिक मान्यता मिळाली ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी खरोखर अभिमानास्पद आहे.
जागतिक योग परिषदेसारख्या कार्यक्रमांद्वारे, योगाभ्यास करण्याकडे अधिक लोक आकर्षित होतील.
ही परिषद आयोजित केल्याबद्दल आणि सर्वसामान्यांमध्ये निरोगी राहणीमानाविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल त्यांनी स्वामी डॉ. भारतभूषण आणि मोक्ष्यतन संस्थान यांचे मनापासून आभार मानले.


Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727373)
Visitor Counter : 221