संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्याने समर्पित रेल्वे मालवाहतुक मार्गिकेवर (DFC) घेतल्या चाचण्या

Posted On: 15 JUN 2021 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

भारतीय रेल्वेने नुकतीच समर्पित मालवाहतुक मार्गिका (DFC) विकसित केली आहे. त्यामुळे देशभरात वेगाने मालवाहतुक सेवा पुरवली जात आहे. भारतीय सैन्याने, सोमवारी (14 जून 2021), नवी रेवारी ते नवी फुलेरा या दरम्यान लष्करी रेल्वेची यशस्वी चाचणी  घेतली. यात सैन्याची वाहने आणि उपकरणे होती. DFC च्या कार्यक्षमतेवर या चाचणीने लष्कराकडून शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय सैन्याचे, भारतीय समर्पित मालवाहतुक मार्गिका महासंघ लिमिटेड ( डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड , DFCCIL) आणि भारतीय रेल्वेबरोबर असलेल्या  समन्वयाने सैन्यदलांसंबधित वाहतुकीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या चाचण्या, राष्ट्रीय संसाधनांच्या अनुकुलतेसाठी आणि विविध मंत्रालये तसेच विभागांमधे ताळमेळ राखला जावा याकरता "संपूर्ण राष्ट्र" दृष्टीकोनाचा एक भाग होता.   भारतीय सैन्याचा, रेल्वे आणि DFCCIL सह संबंधित घटकांबरोबरच्या परस्पर संवादामुळे सैन्यदलां संबंधित वाहतुकीसाठी DFC आणि संबंधित पायाभूत सुविधेचा लाभ घेता येईल. यादृष्टीने ठराविक ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. त्यातून सैन्याच्या 'रोल ऑन रोल ऑफ' (रोरो) सेवेवर  सहाय्य केले जाईल. यासाठी कार्यपद्धतीही विकसित केली जात आहे. या चाचण्या, सैन्यदलाच्या कार्यप्रवणतेची  सज्जता वाढवण्याच्या प्रक्रीयेतील महत्वाचे पहिले पाऊल आहे. हा उपक्रम राष्ट्रीय पायाभूत सुविधां अंतर्गत नियोजनाच्या टप्प्यावरच सैन्याच्या गरजा पूर्ण  होण्याची प्रक्रिया सुनिश्चित करतो.

 

M.Iyengar/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1727270) Visitor Counter : 189