PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
14 JUN 2021 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 14 जून 2021


- India's Active Caseload declines to 9,73,158; below 10 lakhs after 66 days
- India reports 70,421 new cases in the last 24 hours; lowest after 74 days
- 1,19,501 patients recovered during the last 24 hours
- Recoveries continue to outnumber Daily New Cases for the 32nd consecutive day
- Recovery Rate increases to 95.43%
- Daily positivity rate at 4.72%, less than 10% for 21 consecutive days
- 25.48 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी आहे.गेल्या 24 तासात देशात 70,421 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सातव्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फलित आहे.
भारतात उपचाराधीन रुग्ण संख्येतही सातत्याने घट होत आहे. देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या आज 9,73,158 आहे. 66 दिवसानंतर भारतातली उपचाराधीन रुग्णसंख्या 10 लाखापेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 53,001 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 3.30% आहेत.
कोविड-19 संसर्गातून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग 32 व्या दिवशीही जास्त आहे. गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे 50,000 (49,080) ने अधिक होती.
महामारीच्या सुरवातीपासूनच्या कोरोना बाधितामधून 2,81,62,947 लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या 24 तासात 1,19,501 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर उंचावत असून हा दर 95.43%, झाला आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून गेल्या 24 तासात 14,92,152 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत सुमारे 38 कोटी(37,96,24,626) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्या वाढवत असतानाच साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 4.54% असून दैनंदिनपॉझीटीव्हिटी दर आज 4.72% आहे. सलग 21 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 35,32,375 सत्राद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकूण 25,48,49,301 मात्रा देण्यात आल्या.
इतर अपडेटस्
· कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि वेगवान धोरणाला 1 मे 2021पासून सुरुवात झाली. या धोरणानुसार, दरमहा, कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा भारत सरकार खरेदी करेल. आधीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 26.68 कोटींपेक्षा जास्त (26,68,36,620) लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत. आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,
वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 25,27,66,396 मात्रा देण्यात आल्या आहेत.
· लीपोसोमल अम्फोटेरिसिन-बी या औषधाच्या अतिरिक्त 1,06,300 वायल्स सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना आज वितरित करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. कन्व्हेंशनल अम्फोटेरिसिन-बी औषधाच्याही एकूण 53,000 वायल्स सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.
· कोविड-19 विरोधातल्या लढ्यात देशाच्या ऑक्सिजनबाबतच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने, देशाच्या विविध जिल्ह्यात, पीएम केअर्स निधीतून 850 ऑक्सिजन सयंत्रे उभारण्यात येत असल्याची माहिती,डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव डॉ सी सतीश रेड्डी यांनी दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ व्याख्यानमालेत ते बोलत होते.
· थ्रीडी प्रिंटिंग आणि फार्मास्युटिकल्सच्या एकत्रीकरणातून नवीन प्रकारचा मास्क तयार झाला आहे जो विषाणूचे कण संपर्कात आल्यास त्यांच्यावर हल्ला करतो. पुणे इथल्या थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेल्या या मास्कना बाहेरून विरुसाईड्स या विषाणूरोधक घटकांचे कोटिंग आहे. व्हायरुसीडल मास्क प्रकल्प हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची वैधानिक संस्था असलेल्या तंत्रज्ञान विकास मंडळाकडून व्यावसायीकरणासाठी आर्थिक सहाय्य मिळालेल्या आणि कोविड विरोधातील लढाईतील सुरुवातीच्या प्रकल्पापैकी एक आहे.
· भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी, रोपर ने सी पॅप (CPAP) या उपकरणाला पर्याय ठरू शकेल असे ‘जीवन वायू’ हे उपकरण विकसित केले आहे. हे देशातील असे पहिलेच उपकरण आहे ज्याला विद्युत पुरवठ्याची आवश्यकता नसल्यामुळे प्राणवायू निर्मिती संच म्हणजेच ऑक्सिजन सिलेंडर तसेच ऑक्सीजन पाइपलाइन या रुग्णालयातील उपकरणांना जोडता येऊ शकेल. सध्याच्या CPAP उपकरणाला ही सुविधा नाही.
महाराष्ट्र अपडेट्स :-
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर 15 जूनपर्यंत अती ते अतीतीव्र स्वरूपाच्या मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली होती, हे लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने मुंबई, उपनगरे आणि कोकणांमधील काही भागात काही काळ लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी महाराष्ट्रात 10,442 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोविड रुग्णांची एकूण संख्या 59,08,992 वर पोहोचली. गेल्या 24 तासात राज्यात 483 जण कोविडला बळी पडले त्यामुळे मृत्यूंची एकूण संख्या 1,11,104 वर पोहोचली. त्याचवेळी 7,504 जण कोविड मुक्त झाले त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 56,39,271 झाली. गेल्या 24 तासात मुंबईत 700 नव्या रुग्णांची नोंद झाली, 704 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले तर 19 मृत्यूची नोंद झाली. काळी बुरशी किंवा म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या रविवारी 7,395 होती, यापैकी 644 जण मृत्युमुखी पडले तर 2,212 जण आजारातून बरे झाले.
गोवा अपडेट्स:-
गोवा राज्य सरकारने राज्यातील करोना टाळेबंदी या महिन्याच्या 21 तारखेपर्यंत वाढवली आहे. रविवारी गोव्यातील करोना विषाणू रुग्णांची संख्या 420 ने वाढून 1,62,468 वर पोचली तर मृत्यूची संख्या 14 ने वाढून 2,928 वर पोचली.
दिवसभरात 581 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले त्यामुळे या किनारपट्टीच्या राज्यातील बरे झालेल्यांची संख्या 1,54,658 झाली. सध्या राज्यात 4,882 सक्रिय रुग्ण आहेत.
Important Tweets
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727088)